धक्कादायक! पाचव्या मजल्यावरुन उडी घेऊन तरुणाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 15:24 IST2020-07-15T15:03:53+5:302020-07-15T15:24:50+5:30
खोटे नगर परिसरातील घटना : कारण मात्र अस्पष्ट

धक्कादायक! पाचव्या मजल्यावरुन उडी घेऊन तरुणाची आत्महत्या
जळगाव : खोटे नगर परिसरातील पंडीत क्वॉर्नर या अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरुन उडी घेऊन संदीप धर्मराज निरखे (३५,मुळ रा.आव्हाणे, ता.जळगाव) या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री ११ वाजता घडली. संदीप याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही, मात्र त्याने मद्याच्या नशेत उडी घेतल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप हा फेब्रीकेशनचे काम करीत होता. खोटे नगर परिसरातील पंडीत क्वॉर्नर या अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावर तो कुटुंबासह वास्तव्याला होता. मंगळवारी दुपारपासून तो तणावात होता. त्यामुळे त्याने मद्य प्राशन केले होते. घरी जातानाही तो मद्याच्याच नशेत गेला. रात्री अकरा वाजता घरातील गॅलरीत गेला.
मुलीने केला रोखण्याचा प्रयत्न
तेथून उडी मारण्याचा प्रयत्न करताना त्याच्या मुलीने त्याला पाहिले व रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात तिला अपयश आले. गॅलरीतून खाली उडी घेतली. डोक्यातून प्रचंड रक्तस्त्राव व गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. संदीप याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी व भाऊ असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नसले कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. संदीप हा मुळचा आव्हाणे, ता.जळगाव येथील रहिवाशी असून पाच वर्षापासून तो शहरात रहायला आला होता.
अन्य महत्वाच्या बातम्या...
एमबीएचा विद्यार्थी निघाला गुन्हेगार, दोघांना ३ पिस्तुलांसह अटक
वादग्रस्त साहिलची ऑडिओ क्लिप व्हायरल, पोलिसांकडून जागोजागी छापेमारी
बनावट प्रोफाईल तयार करून मार्केटिंग करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश