हाडांचा चुराडा होईपर्यंत मारहाण, तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 07:49 IST2022-04-22T07:46:38+5:302022-04-22T07:49:46+5:30

सतीश खरे आणि सागर खरात या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मनोज आव्हाड (२७) असे मृताचे नाव आहे.

young man beaten to death | हाडांचा चुराडा होईपर्यंत मारहाण, तरुणाचा मृत्यू

हाडांचा चुराडा होईपर्यंत मारहाण, तरुणाचा मृत्यू

औरंगाबाद : लाईट फोकस चोरल्याच्या संशयावरून एका वॉचमन तरुणाचे हातपाय बांधून  आठ जणांनी लाकडी दांड्याने ठेचून ठार मारल्याची घटना बुधवारी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. ही मारहाण इतकी अमानुष होती की, मृताच्या शरीरातील हाडांचा जणू चुराडाच झाला.

सतीश खरे आणि सागर खरात या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मनोज आव्हाड (२७) असे मृताचे नाव आहे. खरातने महापालिकेकडून मेघावाले सभागृह भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतले आहे. मनोज तेथे वॉचमन होता. चार दिवसांपूर्वी तेथे एका महिलेचा मोबाईल चोरीला गेला. तो मनोजने चोरल्याचा संशय होता. दोन दिवसांपूर्वी दोन लाईट फोकस आणि वायरची चोरी झाली. 

बुधवारी दुपारी मनोज आईसह घरी होता. आठ आरोपी त्याच्या घरी गेले आणि कामावर जायचे आहे, असे सांगून ते त्याला घेऊन हॉलवर आले. चोरीची कबुली देण्यासाठी त्याला हातपाय बांधून लाकडी दांड्याने ठेचत राहिले. तो बेशुद्ध पडला. आरोपींनी त्यास शासकीय रुग्णालयात नेऊन टाकले. तेथे मनोजचा मृत्यू झाला. 
 

Web Title: young man beaten to death