शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
4
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
5
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
6
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
7
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
8
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
9
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
10
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
11
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
12
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
13
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
14
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
15
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
17
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
18
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
19
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
20
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 

काल काश्मिरी पंडिताची तर आज पोलीस कॉन्स्टेबलची घरात घुसून हत्या, २४ तासांत दुसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 5:26 PM

Kashmir Terrorist Attack : पोलीस प्रवक्त्याने सांगितले की, जिल्ह्यातील गुडरु येथे आज सकाळी पोलीस कॉन्स्टेबल रियाझ अहमद ठोकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.

जम्मू-काश्मीरमधील एका कॉन्स्टेबलची आज पुलवामा जिल्ह्यातील गुडरू भागात त्याच्या राहत्या घरात घुसून दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. गेल्या २४ तासांत काश्मीरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांनी केलेली ही दुसरी हत्या आहे.पोलीस प्रवक्त्याने सांगितले की, जिल्ह्यातील गुडरु येथे आज सकाळी पोलीस कॉन्स्टेबल रियाझ अहमद ठोकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. जखमी पोलिसाला तातडीने शहरातील लष्कराच्या 92 बेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, परंतु जखमी अवस्थेत त्यांचा मृत्यू झाला. तसेच काल गुरुवारी, काश्मिरी पंडित आणि सरकारी कर्मचारी असलेल्या राहुल भट्ट यांची बडगाम जिल्ह्यातील चदूरा येथील कार्यालयात दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यामुळे काश्मीर परिसरात खळबळ माजली आहे. अनेकठिकाणी निदर्शनं करण्यात येत आहेत. जम्मू काश्मिरमधील बडगाम जिल्ह्यात गुरुवारी काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या कार्यालयात घुसून दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. दरम्यान आज एका पोलीस कॉन्स्टेबलची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. त्यांच्याही घरात घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या असून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

 

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांना शुक्रवारी सकाळी पुलवामा येथे भट्ट कुटुंबीयांना भेटण्यास परवानगी नाकारण्यात आली. मुफ्ती म्हणाल्या की, केंद्र सरकारच्या “त्यांच्या संरक्षणात अपयश”विरोधात निषेध करणार्‍या काश्मिरी पंडितांशी एकता व्यक्त करण्यासाठी मला बडगामला भेट द्यायची आहे. शुक्रवारी एका ट्विटमध्ये, मुफ्ती पुढे म्हणाले की, "काश्मिरी मुस्लिम आणि पंडित एकमेकांच्या वेदनांबद्दल सहानुभूती बाळगतात ही वस्तुस्थिती त्यांच्या दुष्ट सांप्रदायिक कथनात बसत नाही म्हणून तिला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे."

काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या पत्नीचा गंभीर आरोप, 'धोका असूनही सुरक्षा नाही मिळाली'माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पोलिसांच्या उच्च दर्जाच्या सुरक्षेला “लज्जास्पद” असे संबोधले आणि ते पुढे म्हणाले, “काश्मीरच्या लोकांसाठी हे नवीन नाही कारण जेव्हा सर्व प्रशासन हातोडा असते तेव्हा प्रत्येक समस्या खिळ्यासारखी असते. जर नायब राज्यपाल सरकार जर काशिमीरी पंडितांचे संरक्षण करू शकत नसेल तर त्यांना निषेध करण्याचा अधिकार आहे.”

टॅग्स :FiringगोळीबारTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीPoliceपोलिसOmar Abdullahउमर अब्दुल्लाMehbooba Muftiमहेबूबा मुफ्ती