दोन बायका फजिती ऐका! हिंदी मालिकांच्या रायटरने 2 बायकांच्या खर्चासाठी छापल्या बनावट नोटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 00:13 IST2019-03-22T00:10:55+5:302019-03-22T00:13:51+5:30

देवकुमार पटेल असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

Writer of Hindi owners, fake notes printed for 2 women's expenditure | दोन बायका फजिती ऐका! हिंदी मालिकांच्या रायटरने 2 बायकांच्या खर्चासाठी छापल्या बनावट नोटा

दोन बायका फजिती ऐका! हिंदी मालिकांच्या रायटरने 2 बायकांच्या खर्चासाठी छापल्या बनावट नोटा

ठळक मुद्दे ५ लाख ७८ हजार रुपये किंमतीच्या 2 हजार, पाचशे आणि १०० रुपयांच्या नोटा सापडल्या आहेत. , बॅगेत 5 लाख रुपये भरून बदलून घेण्यासाठी जात असताना तो मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

मुंबई - हिंदी मालिकांचा रायटरची दोन लग्नं झालेली आहेत. त्यांचा खर्च भागविण्यासाठी त्याने चक्क बनावट नोटा छापल्या. मात्र, बॅगेत 5 लाख रुपये भरून बदलून घेण्यासाठी जात असताना तो मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या जाळ्यात सापडला. देवकुमार पटेल असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

त्याच्याकडून ५ लाख ७८ हजार रुपये किंमतीच्या 2 हजार, पाचशे आणि १०० रुपयांच्या नोटा सापडल्या आहेत. त्या बनावट नोटा पोलीसांनी नाशिकमधील लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवून दिल्या आहेत. देवकुमार पटेल हा हिंदी मालिकांसाठी पटकथा लिहितो. त्याने अनेक मालिकांसाठी लेखन केले आहे. त्याची दोन लग्नं झालेली आहेत. त्याची एक पत्नी मॉडेल आणि दुसरी गृहिणी आहे. दोन्ही पत्नींचा खर्च भागविण्यासाठी तो बनावट नोटा छापत होता. या नोटा बदली करून घेण्यासाठी तो जात असताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्याने काही नोटा मध्य प्रदेशात वापरल्या होत्या. ग्रामीण भाग असल्याने कोणाला संशय आलेला नाही.

Web Title: Writer of Hindi owners, fake notes printed for 2 women's expenditure