कुऱ्हाडीने घाव घातले, धारदार हत्याराने गळे कापले, एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 07:03 PM2021-10-02T19:03:04+5:302021-10-02T19:03:54+5:30

Crime News: एकाच कुटुंबातील चार जणांची गळा कापून हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. मृतांमध्ये एका सहा वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे.

Wounded with an ax, cut with a sharp knife, brutally murdered four members of the same family in Jharkhand | कुऱ्हाडीने घाव घातले, धारदार हत्याराने गळे कापले, एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या 

कुऱ्हाडीने घाव घातले, धारदार हत्याराने गळे कापले, एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या 

Next

रांची - झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. जिल्ह्यातील हाटगम्हरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केनपोसी गावामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची गळा कापून हत्या करण्यात आली. (CrimeNews) ही घटना शुक्रवारी रात्री घडली. मृतांमध्ये एका सहा वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुन्हेगारांनी हे हत्याकांड घडवून आणले आहे. संपूर्ण कुटुंबाची हत्या करून गुन्हेगार गावामधून फरार झाले आहेत. गावापासून काही अंतरावर कुटुंबातील सर्व सदस्यांचे मृतदेह सापडले.  ग्रामस्थांनी सकाळी शेतामध्ये चार जणांचे मृतदेह पाहिले. त्यानंतर गावात खळबळ उडाली. पोलिसांना या घटनेची खबर त्वरित देण्यात आली. (Wounded with an ax, cut with a sharp knife, brutally murdered four members of the same family in Jharkhand)

मृतांची ओळख केनपोसी गावातील रहिवासी ओनामुनी खंडाईत (२६), त्यांची पत्नी मानी खंडाईत (२२), त्यांचा मुलगा मुगरू खंडाईत (६) तसेच भाऊ गोबरो खंडाईत (२२) अशी पटली हे. पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मृतदेहांना पाहून असे वाटते की, सर्वांची कुऱ्हाडीने कापून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सर्वांच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार केल्याच्या खुणा आढळल्या आहेत. मृतांमध्ये एका सहा वर्षीय बालकाचाही समावेश आहे. मात्र पोलिसांना घटनास्थळावरून कुठलेही हत्यार मिळाले नाही.

पोलिसांनी या प्रकरणी सध्या काहीही बोलण्यास नकार दिला आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे. मृतदेह जप्त करून पोस्टमार्टमसाठी सदर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. तसेच ग्रामस्थही खूप काही बोलण्यास कचरत आहेत. 

Web Title: Wounded with an ax, cut with a sharp knife, brutally murdered four members of the same family in Jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app