मोबाईलचे दुकान फोडून पावणे चार लाखांचा ऐवज लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 15:32 IST2019-03-01T15:32:00+5:302019-03-01T15:32:35+5:30

मोबाईलचे दुकान फोडून चोरट्याने पावणे चार लाखांचा ऐवज लंपास केला.

worth four lakh rupees thief from The mobile shop | मोबाईलचे दुकान फोडून पावणे चार लाखांचा ऐवज लंपास 

मोबाईलचे दुकान फोडून पावणे चार लाखांचा ऐवज लंपास 

पिंपरी : मोबाईलचे दुकान फोडून चोरट्याने पावणे चार लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास थेरगाव येथे उघडकीस आली.याप्रकरणी हेमराज जेसाराम कुमावत (वय २६, रा. पवारनगर, १६ नंबर बसस्टॉप, थेरगाव)यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कुमावत यांचे थेरगाव येथील १६ नंबर बसस्टॉप येथे ममता मोबाईल अ‍ॅड. इलेक्ट्रॉनिक्स नावाचे दुकान आहे. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. त्यानंतर गुरुवारी सकाळी दुकान उघडण्यास आले असता दुकानात चोरी झाल्याचे समोर आले. 
दुकान कुलूप लावून बंद असताना दुकानाच्या छताचा सिमेंटचा पत्रा व पीओपी तोडून चोरटा आत शिरला. दुकानातील ३ लाख ७६ हजार रुपये किंमतीचे वेगवेगळया किंमतीचे मोबाईल व २ हजार रुपये किंमतीचा डीव्हीआर असा एकूण ३ लाख ७८ हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

Web Title: worth four lakh rupees thief from The mobile shop