शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

वरळीत खळबळ! राहत्या घरात पती पत्नी आढळले मृतावस्थेत; कोरोनाने होतं दाम्पत्य त्रस्त

By पूनम अपराज | Published: July 22, 2021 6:40 PM

Suicide Case : काल म्हणजेच बुधवारी १२ वाजताच्या सुमारास सुज्जा यांच्या आईने केरळहून तिला अनेकदा कॉल केला. मात्र आपली मुलगी कॉल रिसिव्ह करत नसल्या कारणाने चिंतेत असलेल्या आईने मुलीच्या मैत्रिणीला कॉल केला.

ठळक मुद्देमृतदेह ताब्यात घेऊन नायर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मृत पतीचे नाव अजय कुमार (३०) तर पत्नीचे नाव सुज्जा एस (३४) असं आहे. 

पूनम अपराज

मुंबई - वरळी नाक्यानजीक असलेल्या भारत मिल संकुलात पती पत्नीचे मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. काल सायकांळी ७ वाजताच्या सुमारास पोलिसांच्या नियंत्रण कक्षास पती पत्नीचे मृतदेह आढळल्याची माहिती त्यांच्या मैत्रिणीनं दिली. त्यानंतर वरळी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेऊन नायर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मृत पतीचे नाव अजय कुमार (३०) तर पत्नीचे नाव सुज्जा एस (३४) असं आहे. 

 

हे दाम्पत्य मूळचे केरळ येथील असून ते फोर्ट परिसरातील एका बँकेत काम करतात. गेल्या ९-१० महिन्यांपूर्वी या दोघांचे लग्न झाले असून वरळी येथील भारत मिल संकुलात भाड्याने राहतात. या दाम्पत्याला एप्रिल - मे २०२१ दरम्यान कोरोनाबाधित झाले होते. त्यानंतर त्यांनी कोरोनाचा धसका घेतला होता. त्यातूनच या पती पत्नीने आत्महत्या केल्याचा संशय असल्याचं वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कोळी यांनी लोकमतशी बोलताना सांगितलं. याबाबत पुढील तपास शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सुरु केला जाईल. पतीचा मृतदेह स्वयंपाकघरात तर पत्नीचा मृतदेह बाथरूम आणि हॉलच्या मधल्या पॅसेजमध्ये आढळला असल्याची माहिती कोळी यांनी दिली. 

काल म्हणजेच बुधवारी १२ वाजताच्या सुमारास सुज्जा यांच्या आईने केरळहून तिला अनेकदा कॉल केला. मात्र आपली मुलगी कॉल रिसिव्ह करत नसल्या कारणाने चिंतेत असलेल्या आईने मुलीच्या मैत्रिणीला कॉल केला. ती मैत्रीण देखील मुलगी जिथे राहते त्याच इमारतीत राहते. मैत्रीण सुज्जाच्या घराच्या दरवाजा ठोठावू लागली. पण काही प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर शेजारच्यांनी दरवाज्याला धक्का देऊन दरवाजा खोलून रात्री ७ च्या सुमारास घरात प्रवेश केला असता पती - पत्नी मृतावस्थेत आढळले. त्यानंतर १०० नंबरला कॉल करून माहिती देण्यात आली. त्यानुसार वरळी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहचले. मृत पती पत्नीचे भाऊ केरळहून पोलीस ठाण्यात दाखल झाले असून त्यांना मृतदेह लवकरच देण्यात येईल असे पुढे कोळी म्हणाले. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMumbaiमुंबई