खडकीत कामगार दाम्पत्यानेच मारला ३५ लाखांवर डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 16:48 IST2018-11-12T16:44:29+5:302018-11-12T16:48:46+5:30

दिवाळी निमित्त देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले असताना त्यांच्याकडील कामगार दाम्पत्याने अन्य दोघांच्या मदतीने बोपोडीतील घरात शिरुन ३४ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.

workers couples thefts of 35 lakhs at khadki | खडकीत कामगार दाम्पत्यानेच मारला ३५ लाखांवर डल्ला

खडकीत कामगार दाम्पत्यानेच मारला ३५ लाखांवर डल्ला

पुणे : दिवाळी निमित्त देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले असताना त्यांच्याकडील कामगार दाम्पत्याने अन्य दोघांच्या मदतीने बोपोडीतील घरात शिरुन ३४ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.
मुकेश सिंग (वय ३०), त्याची पत्नी पारो (वय २३), केसर साई (वय ३०, सर्व रा़ शिवाजी गार्डनसमोर बोपोडी) व त्यांच्याकडे आलेला पाहुणा सुरेंद्र सिंग यांच्यावर खडकीपोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़.
याप्रकरणी आशिष भवरलाल जैन (वय ३९, रा़ कुंदन इस्टेट, भाऊ पाटील रोड, बोपोडी) यांनी फिर्याद दिली आहे़. ही घटना १० नोव्हेंबरला सकाळी साडेसात ते ११ नोव्हेंबरला सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान घडला़. 
आशिष जैन हे कॉन्ट्रॅक्टर असून मुकेश सिंग व त्यांची पत्नी त्यांच्याच बंगल्यात राहत होते़. ते मुळचे नेपाळमधील आहेत़ जैन कुटुंबासह देवदर्शनासाठी गेले होते़. हे या लोकांना माहिती असल्याने त्यांनी संगनमत करुन घराच्या वडिलांचे रुमचे बंद खिडकीचे लॉक उचकटून त्याद्वारे घरात प्रवेश केला़. घरातील तीन बेडरुममधील लाकडी कपाटाचे लॉक तोडून कपाटातील लॉकरचेही लॉक तोडले. 
कपाटातील मौल्यवान वस्तू, डायमंड, सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ३४ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला़. बंगल्यावर सुरक्षारक्षक आहे़. त्याने या सर्वांना बॅगा भरुन घेऊन जाताना पाहिले़. जैन कुटुंब घरी आल्यानंतर घरफोडीचा हा उघडकीस आला आहे़. सिंग व त्यांच्या साथीदारासह पळून गेला असून खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते अधिक तपास करत आहेत. 

Web Title: workers couples thefts of 35 lakhs at khadki