उर्मिलाविरोधातील आक्षेपार्ह पोस्टबाबत महिला आयोगाने घेतली दखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 20:25 IST2019-05-28T20:21:17+5:302019-05-28T20:25:00+5:30
कुडतरकर याच्याविरोधात कलम ३५४(ए) १(४) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमनच्या कलमांर्तंगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उर्मिलाविरोधातील आक्षेपार्ह पोस्टबाबत महिला आयोगाने घेतली दखल
मुंबई - काँग्रेसच्या उमेदवार आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यावर सोशल मीडियावर अपमानास्पद आणि आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय कुडतरकर (५७) असं या व्यक्तीचं नाव असून तो पुणे येथे राहणारा आहे. त्यामुळे या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय कुडतरकर याच्याविरोधात कलम ३५४(ए) १(४) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमनच्या कलमांर्तंगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. तसेच अभिनेत्री उर्मिली मातोंडकर यांच्याबाबत सामाजिक माध्यमांवर धनंजय कुडतरकर नावाच्या व्यक्तीने टाकलेल्या आक्षेपार्ह मजकूराची महाराष्ट्र महिला आयोगाने स्वाधिकारे दखल घेत राज्याचे महिला अत्याचार प्रतिबंध विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिगावकर यांना पत्रव्यवहार केला आहे.
पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. काँग्रेसकडून उर्मिला मातोंडकरला उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी तिचा पराभव केला.
अभिनेती उर्मिली मातोंडकर यांच्याबाबत सामाजिक माध्यमांवर धनंजय कुडतरकर नामक व्यक्तीने टाकलेल्या आक्षेपार्ह मजकूराची महाराष्ट्र महिला आयोगाने सोमवारी (दि 27) स्वाधिकारे दखल घेतली. यासंदर्भात महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांकडून अहवाल मागितला आहे. pic.twitter.com/620DS3baKb
— Maharashtra Women Commission (@mscw_bandra) May 28, 2019