शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

येरवड्यात सराईत गुन्हेगाराला पकडण्यास गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की; पाच महिलांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 1:06 PM

पुणे : सराईत गुन्हेगार हातात कोयता घेऊन लोकांना शिवीगाळ करीत असल्याची माहिती मिळाल्यावर त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की वमारहाण ...

ठळक मुद्देसराईत गुन्हेगार हातात कोयता घेऊन लोकांना शिवीगाळ करीत असल्याची माहिती

पुणे : सराईत गुन्हेगार हातात कोयता घेऊन लोकांना शिवीगाळ करीत असल्याची माहिती मिळाल्यावर त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की वमारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी येरवडापोलिसांनीमहिलांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. पोलीस शिपाई सागर कोतवाल यांनी येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार येरवड्यातील लक्ष्मीनगर येथील निळा झेंडा चौकात बुधवारी दुपारी २ वाजता घडला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार दादा ऊर्फ विनोद पोपट कांबळे हा हातात कोयता घेऊन लोकांना शिवीगाळ करत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रशांत किर्वे यांना मिळाली होती. त्यानुसार कोतवाल हेत्यांच्या इतर सहकाऱ्यांसह निळा झेंडा चौकात गेले होते. पोलिसांना पाहून कांबळे हा एका घरात पळून गेला. त्याला पकडण्यासाठी पोलीसही त्याच्या पाठोपाठ जाऊ लागले. तेव्हा पाच महिलांनी पांलिसांना घरात जाण्यास प्रतिबंध केला. त्यांना बाजूला होण्यास सांगितल्यानंतरही त्या पोलिसांची वाट अडवून त्यांच्या अंगावर धावून गेल्या. उलट पोलिसांना त्यांनी तेथून निघून जाण्यास सांगितले व न गेल्यास नोकरी घालविण्याची धमकी दिली. या महिलांनी पोलिसांना धक्काबुक्की करून हातावर दगड मारून कोतवाल यांना अडविले. पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल या पाच महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदुम अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेYerwadaयेरवडाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिला