पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणावरून महिलेला धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 15:59 IST2018-10-17T15:56:31+5:302018-10-17T15:59:18+5:30
काही दिवसांपूर्वी पीडित महिलेने आरोपीच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्याचा राग मनात धरुन मंगळवारी आरोपी महिलेच्या घरात शिरत अश्लील भाषेत शिवीगाळ करुन, धमकी दिली.

पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणावरून महिलेला धमकी
पिंपरी : पोलिसांकडे तक्रार दिली म्हणून एका ३२ वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिला अश्लील भाषेत शिवीगाळ करुन, पुन्हा पोलिसांत तक्रार दिल्यास इज्जतीची वाट लावेन,अशी धमकी दिल्याचा प्रकार चिंचवड येथील पवनानगर घडला आहे. याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. गणेश उर्फ चेतन बाळासाहेब भुजबळ (रा. जाधववाडी, चिखली)असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पीडित महिलेने आरोपी गणेश याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्याचा राग मनात धरुन मंगळवारी आरोपी महिलेच्या घरात शिरला. तु पुन्हा पोलिसात तक्रार दिलीस तर तुज्या इज्जतीची वाट लावेन अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. महिलेने आरडाओरड केल्याने गणेश तेथून पसार झाला. याप्रकरणी महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.