यवत येथे डोक्यात दगड घालून महिलेचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 15:33 IST2018-12-06T15:28:04+5:302018-12-06T15:33:27+5:30
खून झालेली महिला यवत येथील सहकारनगर मधील रहिवासी आहे.

यवत येथे डोक्यात दगड घालून महिलेचा खून
ठळक मुद्देखुनाचे कारण अद्याप अस्पष्ट
यवत :- यवत येथे पावर हाऊसच्या मागे एका महिलेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडल्याची शक्यता आहे. सीताई भीमराव शेगर (वय - ३४) असे महिलेचे नाव आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासकार्य सुरु केले आहे. परंतु, अद्याप खुनाचे कारण स्पष्ट झालेले नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खून झालेली महिला यवत येथील सहकारनगर मधील रहिवासी आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आहे.अपर पोलिस अधीक्षक संदीप पखाले , पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासकार्य सुरु आहे.