शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

सासरी झालेल्या मारहाणीमुळे विवाहितेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 3:23 AM

सासरच्या मंडळींकडून झालेल्या मारहाणीमुळे सोनाली ऊर्फ दर्शना संदीप महाले (२५) हिचा मृत्यू झाल्याची तक्रार तिचे वडील रतन चोथे यांनी गुरुवारी शहापूर पोलीस ठाण्यात केली आहे.

शहापूर  - सासरच्या मंडळींकडून झालेल्या मारहाणीमुळे सोनाली ऊर्फ दर्शना संदीप महाले (२५) हिचा मृत्यू झाल्याची तक्रार तिचे वडील रतन चोथे यांनी गुरुवारी शहापूर पोलीस ठाण्यात केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीअंती आणि तक्रारदाराच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक महेश शेट्ये यांनी सांगितले.मोहिली येथील सोनाली ऊर्फ दर्शना संदीप महाले (२५) या पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून झालेल्या मारहाणीमुळे मृत्यू झाला. वडिलांकडून दुचाकीसाठी पैसे आणण्यासाठी पती संदीप दत्तू महाले यांनी दर्शनाकडे तगादा लावला होता. सासरच्या इतर मंडळींकडून याबाबत मानसिक त्रास देऊन मारहाणही केली जात होती. याबाबत सोनालीने २० नोव्हेंबर २०१७ रोजी शहापूर पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली होती.२ जानेवारी २०१९ ला सोनाली चक्कर येऊन पडली आणि तिचा मृत्यू झाल्याचे तिच्या पतीने कळवल्याचे रतन चोथे यांनी म्हटले. पैशांची मागणी पूर्ण न झाल्याने पती संदीप, सासू भीमाबाई, सासरा दत्तू, नणंद कविता आणि दीर योगेश महाले तिला मारहाण करत होते. यातच तिचा मृत्यू झाल्याची तक्रार सोनालीचे वडील रतन चोथे यांनी गुरुवारी शहापूर पोलिसांत केली.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी