खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 13:59 IST2025-12-18T13:58:36+5:302025-12-18T13:59:23+5:30
एका पती आणि त्याच्या पत्नीने त्यांच्या घर मालकिणीची हत्या केली. मालकीण चार महिन्यांचं भाडं मागण्यासाठी गेली होती.

फोटो - ndtv.in
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका खळबळजनक घटना समोर आली आहे. एका पती आणि त्याच्या पत्नीने त्यांच्या घर मालकिणीची हत्या केली. मालकीण चार महिन्यांचं भाडं मागण्यासाठी गेली होती. मृत महिलेच्या मोलकरणीच्या सतर्कतेमुळे ही घटना उघडकीस आला. आरोपी मृतदेह घेऊन पळून जात होते. पोलिसांनी आरोपी पती-पत्नीला अटक केली आहे.
दीपशिखा असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. त्या पती उमेश शर्मा आणि कुटुंबासह गाझियाबादच्या नंदग्राम पोलीस स्टेशन परिसरातील राजनगर एक्सटेंशनमधील पॉश सोसायटी औरा चिमेरा येथे राहत होत्या. त्याच सोसायटीच्या दुसऱ्या टॉवरमध्ये त्यांचा आणखी एक फ्लॅट होता. ट्रान्सपोर्टर अजय गुप्ता त्याची पत्नी आकृती गुप्तासोबत तिथे राहत होता.
दीपशिखा चार महिन्यांचं भाडं घेण्यासाठी त्यांच्या घरी गेली होती. बराच वेळ झाला तरी ती परत आली नाही तेव्हा शोध सुरू झाला. मोलकरीण मीना हिने सर्वप्रथम चौकशी केली. मीना अजय गुप्ताच्या फ्लॅटवरही गेली, पण तिथे तिला खोटं सांगितलं. त्यानंतर कुटुंबाने सीसीटीव्ही फुटेज तपासलं, ज्यामध्ये दीपशिखा फ्लॅटमध्ये शिरली होती पण बाहेर आली नव्हती असं दिसलं. पोलिसांना माहिती देण्यात आली. अजय गुप्ताच्या फ्लॅटची झडती घेतली असता त्यांना लाल बॅगेत दीपशिखाच्या मृतदेहाचे तुकडे आढळले.
दीपशिखाच्या घरकाम करणाऱ्या महिलेने सांगितलं की हे कपल मृतदेहाची विल्हेवाट लावणार होते. त्यासाठी त्यांनी सोसायटीत एक ऑटोही बोलावली होती. मात्र, मोलकरणीने त्यांना बाहेर पडण्यापासून रोखलं. त्यानंतर हे कपल लाल बॅग घेऊन त्यांच्या फ्लॅटमध्ये परतलं. पोलिसांनी तपास केला आणि बॅगमधून मृतदेह जप्त केला. आरोपींनी मृतदेहाचे तुकडे केले होते. आरोपी कपलला अटक करण्यात आली आहे.