महिलेची दगडाने ठेचून हत्या; हायफ्रोफाईल गांधारी परिसरात आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 16:08 IST2021-09-06T16:07:31+5:302021-09-06T16:08:19+5:30
Murder Case : गांधारी परिसरात रिंगरूट प्रकल्पाचे काम सुरु आहे. या रस्त्यावर आज सकाळी महिलेचा मृतदेह आढळून आला.

महिलेची दगडाने ठेचून हत्या; हायफ्रोफाईल गांधारी परिसरात आढळला मृतदेह
कल्याण: पश्चिमेकडील हायप्रोफाईल परिसर म्हणून ओळखल्या जाणा-या गांधारी परिसरात एका महिलेचा डोके दगडाने ठेचलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. महिला घर काम करणारी असून तिच्या पतीने हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गांधारी परिसरात रिंगरूट प्रकल्पाचे काम सुरु आहे. या रस्त्यावर आज सकाळी महिलेचा मृतदेह आढळून आला. याची माहिती कल्याणच्या खडकपाडा पोलिसांना देण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक पवार आणि पोलिस निरिक्षक शरद जिने यांनी घटनास्थळी पथकासमवेत धाव घेतली. संबंधित महिलेचे नाव लक्ष्मी मोहिते आहे. ती भिवंडीतील सावद गाव परिसरात राहणारी असून गांधारी परिसरात घरकाम करायची. तीची हत्या तिचा पती जर्नादन याने केली असल्याचा संशय पोलिसांना आहे. सध्या तो बेपत्ता आहे.