शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार गटासह शिंदेसेनेला ‘कॅबिनेट’? ‘एनडीए सरकार’चा पहिला मंत्रिमंडळ विस्तार सप्टेंबरमध्ये
2
भाजपच्या मराठा आमदारांची आज बैठक, दिवसभर मंथन-चिंतन बैठकांचाही जोर
3
दहशतवादाचे कंबरडे मोडा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्देश; दहशतवादी घटनांचा घेतला आढावा
4
AFG vs PNG : अफगाणिस्तानचा जलवा कायम! सुपर-८ च्या तिकिटासाठी अवघ्या ९६ धावांची गरज
5
आजचे राशीभविष्य, १४ जून २०२४: आरोग्य उत्तम राहील, पण रागावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल!
6
न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून बाहेर! शाब्दिक युद्ध पेटलं; दिग्गजानं पाकिस्तानची लायकी काढली
7
भाजीपाल्याचा दुष्काळ: फरसबी, वाटाण्यासह दोडका १६० रुपये किलो, गवार, शेवग्यानेही ओलांडली शंभरी
8
'करा किंवा मरा'च्या सामन्यात इंग्लंडचा 'मोठ्ठा' विजय; अवघ्या १९ चेंडूत सामना जिंकला
9
संसदेत बारामतीचे तीन खासदार, सुनेत्रा पवारांनी भरला राज्यसभेचा अर्ज; विराेधात कुणीच नाही
10
रशियाच्या जप्त संपत्तीतून युक्रेनला मदत करण्यावर जी-७ राष्ट्रे सहमत
11
Wriddhiman Saha ची नवीन खरेदी; १२ व्या वर्षी पाहिलेलं स्वप्न अखेर पूर्ण, म्हणाला...
12
बाजारात आली कमाईची मोठी संधी, सुमारे दोन डझन कंपन्या आणणार ३० हजार कोटींचे आयपीओ
13
Rohit Pawar : 'आघाडीमध्ये संधी मिळाल्यास आमच्याकडे जयंत पाटलांसारखा अनुभवी चेहरा'; रोहित पवारांचं सूचक विधान
14
सूर्या, रोहितला १० वर्षांनी भेटणे विशेष, सौरभ नेत्रावळकरची प्रतिक्रिया
15
१,५६३ उमेदवारांचे ग्रेस गुण रद्द, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती; २३ जून रोजी ‘नीट’ची फेरचाचणी
16
येडीयुरप्पांविरोधात उद्या दाखल होणार चार्जशीट, निकटवर्तीय म्हणतात, ते तर दिल्लीला गेले
17
बांगलादेशची Super 8 च्या दिशेने कूच, नेदरलँड्सची हार अन् माजी विजेत्या श्रीलंकेचे संपले आव्हान
18
मोठी बातमी! टीम इंडियाचे दोन शिलेदार T20 World Cup सोडून मायदेशात परतणार
19
'दीड वर्षापूर्वी विमानतळाच्या कामासाठी आलो होतो, आता मंत्री होऊन आलो'; मुरलीधर मोहोळांनी सांगितला 'तो' किस्सा
20
राहुल गांधी रायबरेली की वायनाड सोडणार; दुसरा उमेदवार कोण? नाव आलं समोर

पबमध्ये केली महिलेची छेडछाड; गुजरातमधील ४ व्यावसायिकांना बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 9:22 PM

याप्रकरणी सांताक्रूझ पोलीस अधिक तपास करत आहेत. 

ठळक मुद्देजुहू तारा रोडावर बोरा बोरा पबमध्ये शनिवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडलीअक्षय राज, राहुल सिन्हा, अरुणसिंह गोहील आणि विराज सिंह हे मुंबईत एका बिझनेस ट्रीपसाठी आले होते. चारही आरोप ३० ते ३५ वयोगटातील आहेत.

मुंबई - पबमध्ये २६ वर्षीय विवाहित महिलेशी छेडछाड केल्याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी गुजरातमधल्या चार व्यावसायिकांना अटक केली. या चौघांनी महिलेच्या पतीला देखील मारहाण केली. जुहू तारा रोडावर बोरा बोरा पबमध्ये शनिवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. याप्रकरणी सांताक्रूझ पोलीस अधिक तपास करत आहेत. 

पीडित महिला जोगेश्वरी येथे रहायाला असून ती पती आणि आणखी एका मित्रासोबत पार्टी करण्यासाठी पबमध्ये आली होती. आरोपींनी आपल्याला पाहून अश्लील हावभाव केले तसेच अश्लील स्पर्श केला असे महिलेने दाखल केलेल्या पोलीस तक्रारीत म्हटले आहे. जेव्हा महिलेच्या नवऱ्याने हस्तक्षेप केला तेव्हा त्यांनी त्याला मारहाण केली. अक्षय राज, राहुल सिन्हा, अरुणसिंह गोहील आणि विराज सिंह हे मुंबईत एका बिझनेस ट्रीपसाठी आले होते. चारही आरोप ३० ते ३५ वयोगटातील आहेत. पोलीस नियंत्रण कक्षाकडून फोन आल्यानंतर पोलीस पबमध्ये पोहोचले. चारही आरोपी गुजरातमधील आहेत अशी पोलीस सूत्रांनी माहिती दिली. 

टॅग्स :ArrestअटकMolestationविनयभंगPoliceपोलिस