धक्कादायक! भांडणानंतर संतापलेल्या निर्दयी पतीने पत्नीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये ठोकला खिळा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 12:41 IST2021-06-01T12:41:22+5:302021-06-01T12:41:51+5:30

पीडितेने पोलिसांना सांगितलं की, घरगुती वादामुळे आधी पतीने तिच्यासोबत गैरवर्तन केलं आणि नंतर रागावलेल्या पतीने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये खिळा ठोकला.

Woman private part spike nail husband Rampur Uttar Pradesh | धक्कादायक! भांडणानंतर संतापलेल्या निर्दयी पतीने पत्नीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये ठोकला खिळा...

धक्कादायक! भांडणानंतर संतापलेल्या निर्दयी पतीने पत्नीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये ठोकला खिळा...

उत्तर प्रदेशच्या रामपूरमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका पतीने त्याच्या पत्नीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये खिळा ठोकल्याची घटना घडली आहे. असे सांगितले जात आहे की, पती आणि पत्नीमध्ये काही कारणावरून वाद पेटला होता. ज्यानंतर रागावलेल्या निर्दयी पतीने पत्नीसोबत हे क्रूर कृत्य करत सर्व सीमा पार केल्या.

या घटनेनंतर महिलेने पतीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. पीडितेने पोलिसांना सांगितलं की, घरगुती वादामुळे आधी पतीने तिच्यासोबत गैरवर्तन केलं आणि नंतर रागावलेल्या पतीने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये खिळा ठोकला. पीडितेकडून पोलिसात लिखित तक्रार देण्यात आली आहे. ज्यानंतर महिलेची मेडिकल टेस्ट करण्यात आली. मात्र यानंतर या घटनाक्रमात वेगाने बदल आला. काही तास दोघांना सोबत बसवल्यावर वाद मिटवला गेला. (हे पण वाचा : धक्कादायक! महिलेकडे सापडलं असं ड्रग्स जे १० लाख लोकांचा जीव घेऊ शकतं!)

पीडित महिलेने सांगितले की, तिचा पती दारू पिऊन घरी आला आणि भांडण करू लागला. यानंतर त्याने माझ्या प्रायव्हेट पार्टमध्ये खिळा टाकला. रात्री १२ वाजता तिने आई-वडिलांना आवाज दिला, पण कुणीही जागे झाले नाही.

अधिकारी श्रीकांत प्रजापती यांनी एका महिलेकडून तक्रार नोंदवून घेतली आहे. तपासानंतर समोर आलं की, पती आणि पत्नीमध्ये काही कारणाने वाद झाला होता. ज्यानंतर महिलेकडून पतीवर आरोप लावण्यात आला की, पतीने तिला मारझोड केली आणि त्यानंतर प्रायव्हेट पार्टमध्ये खिळा ठोकला.  (हे पण वाचा : घरात घुसून गळ्याला चाकू लावत सोनसाखळी चोरी)

महिलेच्या तक्रारीनंतर तिचं मेडिकल चेकअप करण्यात आलं. दोघांतील वादही मिटवला गेला. तपासातून समोर आलं की, दोघांमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला होता. पोलिसांनी आवश्यक ती कारवाई केली.
 

Web Title: Woman private part spike nail husband Rampur Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.