महिलेची ऑनलाईन फसवणूक; मोबाईल हॅक करून रक्कम पळविली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 14:16 IST2025-02-08T14:16:06+5:302025-02-08T14:16:40+5:30
बार्शी : सोलापुरातील बार्शी शहरातील राऊळ गल्ली येथे राहात असलेल्या एका महिलेची तब्बल ५२ हजार रुपयाची ऑनलाईन वरून फसवणूक ...

महिलेची ऑनलाईन फसवणूक; मोबाईल हॅक करून रक्कम पळविली
बार्शी : सोलापुरातील बार्शी शहरातील राऊळ गल्ली येथे राहात असलेल्या एका महिलेची तब्बल ५२ हजार रुपयाची ऑनलाईन वरून फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मोबाईल हॅक करून पैसे दुसऱ्या खात्यावर ट्रान्सफर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शोभा महेश वांगी (४८, रा. बार्शी) यांनी फिर्याद दिली.
अधिक माहिती अशी की, फिर्यादी ह्या बार्शीतील एचडीएफसी बँकेच्या ग्राहक आहेत आणि त्यांच्या बँक खात्याशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर दि. ९ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १ वाजता एसएमएस आला. त्यात १० हजार रुपये काढल्याचे कळवले गेले. काही क्षणांतच पुन्हा दुसऱ्या एसएमएसद्वारे २ हजार रुपये डेबिट नाल्याची माहिती मिळाली.
फिर्यादी महिलेने तातडीने बँक शाखेत जाऊन चौकशी केली असता, त्यांचे खात्यातून ५२ हजार रुपये कमी झाल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. प्राथमिक तपासात समोर आले की, फसवणूक मोबीक्विक अॅपद्वारे केली गेली असून त्या वेळेस रक्कम बॅटल ग्राऊड मोबाईल इंडिया या मोबाईल गेममध्ये वापरण्यात आली. व्यवहारासाठी वापरण्यात आलेला ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक तपासून याचा शोध घेऊन आरोपीच्या ठिकाणी पोहोचले.
तपासाअंती, आरोपीच्या मोबाईल क्रमांकाचा शोध घेतल्यावर, तो नागेश शिवलिंगा (रा. ई-१७२, फोर्थ क्रॉस, पेनीया स्मॉल इंडस्ट्रीज, राजगोपाल नगर, नॉर्थ बंगळुरू, कर्नाटक) याच्या नावावर असल्याचे आढळले. . सध्या पोलिसांनी पुढील तपास सुरू ठेवला असून, आरोपीच्या शोधासाठी सायबर गुन्हे शाखेकडून तांत्रिक विश्लेषण आणि लोकेशन ट्रॅकिंगची कार्यवाही केली जात आहे.