कुलूप लावायला विसरला अन् महिलेने काढला पळ; परदेशात पाठवण्याचं आमिष दाखवून सव्वा महिना केला बलात्कार 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 07:16 PM2021-05-16T19:16:12+5:302021-05-16T19:19:41+5:30

Rape Case : पीडित महिलेने आरोपीच्या तावडीतून सुटून पोलिसात तक्रार दिली असता पोलिसांनी आरोपीसह पत्नी आणि एका मध्यस्थावर  गुन्हा दाखल केला आहे. प्रकरण पंजाबच्या मोगाचे आहे.

The woman forgot to lock it and ran away; She was raped for a month under the pretext of being sent abroad | कुलूप लावायला विसरला अन् महिलेने काढला पळ; परदेशात पाठवण्याचं आमिष दाखवून सव्वा महिना केला बलात्कार 

कुलूप लावायला विसरला अन् महिलेने काढला पळ; परदेशात पाठवण्याचं आमिष दाखवून सव्वा महिना केला बलात्कार 

Next
ठळक मुद्दे आरोपीने तिचा तीन वर्षाचा मुलगा घेऊन आरोपीसोबत गेली. यावेळी आरोपीने तिला जालंधरच्या कॉलनीतील भाड्याच्या घरात जबरदस्तीने ठेवले आणि एक महिना, दहा दिवस येथे तिच्यावर बलात्कार केला.

कॅनडामध्ये त्याच्या बहिणीच्या घरी मोलकरीण म्हणून पाठवण्याच्या बहाण्याने एका २८ वर्षीय महिलेचे अपहरण केलेबी आणि त्यानंतर सुमारे सव्वा महिना भाड्याच्या घरात ठेवून तिच्यावर बलात्कार केला. पीडित महिलेने आरोपीच्या तावडीतून सुटून पोलिसात तक्रार दिली असता पोलिसांनी आरोपीसह पत्नी आणि एका मध्यस्थावर  गुन्हा दाखल केला आहे. प्रकरण पंजाबच्या मोगाचे आहे.


दक्षिण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कर्मजीत कौर यांनी तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार म्हटले आहे की, भालूर गावात राहणारा संत राम उर्फ ​​शेरी याने आपल्या सासरच्या मंडळींना आमिष दाखविले की आपण त्या महिलेला स्वत: च्या खर्चाने कॅनडा पाठवू शकतो. दरम्यान, आरोपी संत राम शेरी याने पीडित महिला आणि तिच्या कुटुंबाची रणजित सिंहशी ओळख उपला (जालंधर) येथे करून दिली.


रणजित सिंह पीडित महिलेच्या घरी आला आणि त्याची बहीण कॅनडामध्ये राहते अशी बतावणी करू लागला. तक्रारदार महिलेला त्याच्या खर्चाने स्वयंपाकघरातील काम करण्यासाठी आपल्या बहिणीच्या घरी पाठवणार असे सांगू लागला. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, ती गरीब कुटुंबातील असून तिच्या घरची परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे ती आरोपीच्या जाळ्यात अडकली.


यामुळे ३ एप्रिल रोजी सकाळी आरोपी रणजित सिंहा पीडितेच्या घरी आला आणि पासपोर्ट व इतर कागदपत्रे घेतल्यानंतर तिला वैद्यकीय तपासणीच्या बहाण्याने महिलेला जालंधरला घेऊन गेला. आरोपीने तिचा तीन वर्षाचा मुलगा घेऊन आरोपीसोबत गेली. यावेळी आरोपीने तिला जालंधरच्या कॉलनीतील भाड्याच्या घरात जबरदस्तीने ठेवले आणि एक महिना, दहा दिवस येथे तिच्यावर बलात्कार केला.

इतकेच नाही तर आरोपीने महिलेचा भाऊ आणि तिच्या पती यांना जिवे मारण्याची धमकी दिली. ११ मे रोजी आरोपी घराबाहेर पडताना बाहेरून दरवाज्याला कुलूप लावायला विसरला तेव्हा संधीचा फायदा घेऊन पीडित महिलेने तिच्या मुलासह तिथून पळ काढला आणि जालंधर पोलिस ठाणे गाठले आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवून आरोपी रणजित सिंह आणि मध्यस्थी संत राम शेरी यांना अटक केली.

आरोपीची पत्नीही या कटात सामील आहे
प्राथमिक तपासात रणजित सिंहची पत्नीही या संपूर्ण कटात सहभागी असल्याचे समोर आले आहे. यामुळे ठाणे शहर दक्षिण येथील पोलिसांनी तिन्ही आरोपींवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याने सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपी रणजित सिंह आणि संत राम शेरी यांच्याकडे रिमांडवर चौकशी केली जात आहे.

फरार आरोपी अमनदीप कौरचा शोध घेत आहे. त्याचवेळी पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी रणजित सिंहने तिच्या आईकडून कॅनेडियन फाईल भरण्याच्या नावावर १५ हजार रुपये घेतले होते आणि या पैशांनी तिने काही फर्निचर व घरातील वस्तू विकत घेतल्या व त्या भाड्याच्या घरामध्ये ठेवल्या. जालंधरच्या भाड्याच्या घरात आरोपीने महिलेवर एक महिना आणि दहा दिवस बलात्कार केला.

 

Web Title: The woman forgot to lock it and ran away; She was raped for a month under the pretext of being sent abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app