Woman died by trap into grinder machine | मळणीयंत्रात अडकून महिलेचा मृत्यू
मळणीयंत्रात अडकून महिलेचा मृत्यू

ठळक मुद्देकरपडी नजीकच्या काळे वस्ती येथील शेतात बाजरीची मळणी करण्याचे काम सुरू होते. पोलिसांकडून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सुनेत्रा नंदराज काळे (वय २८) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

राशीन (जि. अहमदनगर) - बाजरीची सोंगणी करताना मळणी यंत्राच्या पंख्यात डोक्याचे केस अडकून कर्जत तालुक्यातील करपडीनजीकच्या काळे वस्ती येथील महिलेचा मृत्यू झाला. गुरुवारी (दि.२१) सकाळी पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली. सुनेत्रा नंदराज काळे (वय २८) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. करपडी नजीकच्या काळे वस्ती येथील शेतात बाजरीची मळणी करण्याचे काम सुरू होते. मळणीचे काम सुरू असताना खाली सांडलेली बाजरी गोळा करण्यासाठी सुनेत्रा काळे गेल्या होत्या. त्यावेळी त्यांचे केस मळणी यंत्राच्या पंख्यात गुंतले. त्यात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले. मयत महिलेचा भाऊ सोमनाथ रामदास निकत (रा. सोगाव, ता. करमाळा) यांनी राशीन पोलीस दूरक्षेत्र येथे फिर्याद दिली. पोलिसांकडून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Woman died by trap into grinder machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.