बाथरूममध्ये स्कार्फने लावून महिलेने केली आत्महत्या : १ महिन्यापासून सुरु होती कोरोनाशी झुंज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 17:27 IST2021-05-31T17:25:35+5:302021-05-31T17:27:49+5:30
Suicide News : मिरज शासकीय कोविड रुग्णालयात कोविड रुग्णाच्या आत्महत्येची वर्षभरात ही दुसरी घटना आहे.

बाथरूममध्ये स्कार्फने लावून महिलेने केली आत्महत्या : १ महिन्यापासून सुरु होती कोरोनाशी झुंज
मिरज : मिरज शासकीय कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सुमन गणेश कुंभार (वय ४२, रा. सुभाषनगर, ता. मिरज) या महिला रुग्णाने रुग्णालयात बाथरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली. कोविड रुग्णालयातील बाथरूममध्ये सुमन कुंभार यांनी सोमवारी पहाटे ५ वाजता स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली. औषधोपचाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. महिन्यापासून कोरोनावर मात करण्यासाठी धडपड सुरु होती.
कोविड बाधित झाल्याने सुमन यांच्यावर गेले महिनाभर उपचार सुरू होते. त्यांची ऑक्सिजन पातळी कमी जास्त होत असल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयातून दि. १३ मे रोजी मिरज शासकीय कोरोना रुग्णालयात दाखल केले होते. दोन दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार होता. मात्र त्यापूर्वीच सोमवारी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत कुंभार यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. आत्महत्येचे नेमके कारण समजलेले नसले तरी औषधोपचाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा होती. याबाबत गांधी चाैक पोलिसांत नोंद आहे.
Breaking : शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा आणि दंडhttps://t.co/ZX5uXYhGzI
— Lokmat (@MiLOKMAT) May 31, 2021
रुग्णालयात आत्महत्येची दुसरी घटना
मिरज शासकीय कोविड रुग्णालयात कोविड रुग्णाच्या आत्महत्येची वर्षभरात ही दुसरी घटना आहे. नऊ महिन्यांपूर्वी हुसेन बाबूमिया मोमीन या रुग्णानेही उपचार सुरू असताना चाकूने स्वताचा गळा कापून आत्महत्या केली होती. आज सुमन कुंभार या रुग्णाच्या आत्महत्येमुळे सिव्हिलमध्ये खळबळ उडाली होती.