अरे बापरे! कर्मचाऱ्याच्या प्रेमात वेडी झाली मालकीण; लग्नानंतर 'त्याने'च लावला कोट्यवधींचा चुना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 17:55 IST2025-10-24T17:54:24+5:302025-10-24T17:55:38+5:30
निरल एका आयटी फर्मची मालकीण आहे.

अरे बापरे! कर्मचाऱ्याच्या प्रेमात वेडी झाली मालकीण; लग्नानंतर 'त्याने'च लावला कोट्यवधींचा चुना
गुजरातमधील एका महिलेने ओडिशाच्या भद्रक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात फिनाइल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिने तिच्या पतीवर पैसे घेऊन पळून गेल्याचा आरोप केला. तसेच पोलीसही तक्रारीवर कोणतीही कारवाई करत नसल्याचं म्हटलं आहे. अहमदाबाद येथील रहिवासी निरल मोदी बोंथ पोलीस ठाण्यात फिनाइल प्यायली. यानंतर तिला उपचारासाठी भद्रक जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निरल एका आयटी फर्मची मालकीण आहे. तिचं लग्न नरसिंहपूर गावातील मनोज नायकशी झालं होतं. मनोज नायक तिच्या कंपनीत काम करत होता आणि दोघेही प्रेमात पडले. लग्नानंतर मनोजने निरलला त्याच्या गावी व्यवसाय सुरू करण्यासाठी तयार केलं. व्यवसाय सुरू करण्यासाठी निरलने तिचं घर आणि कंपनी गहाण ठेवून अंदाजे ५ कोटी कर्ज काढलं.
मनोजने पैसे घेतले. निरल आणि त्यांच्या लहान मुलाला सोडून पळून गेला. त्यानंतर निरलने अधिकाऱ्यांकडे तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. निरलच्या भावाने सांगितलं की, तक्रार दाखल करूनही या प्रकरणात कोणतीही कारवाई झालेली नाही. माझी बहीण तीन महिन्यांपासून संघर्ष करत आहे. तक्रार दाखल करूनही पोलिसांनी तपासात कोणतंही महत्त्वपूर्ण पाऊल उचलले नाही.
निरलच्या भावाच्या म्हणण्यानुसार, त्याच्या बहिणीने अखेर रागाच्या भरात फिनाइल प्यायलं आहे. ती या सर्व गोष्टींना आता कंटाळली आहे. मनोजवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी मनोज नायकचा संबलपूर, बरहामपूर यासह अनेक ठिकाणी शोध घेत असल्याचं सांगितलं. सध्या या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.