सावकारीला कंटाळून एका महिलेने मंत्रालयाच्या समोर केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 18:33 IST2019-01-18T18:31:51+5:302019-01-18T18:33:52+5:30

सावकारीला कंटाळून एका महिलेने मंत्रालयाच्या समोर केली आत्महत्या 

A woman allegedly committed suicide in front of the ministry | सावकारीला कंटाळून एका महिलेने मंत्रालयाच्या समोर केली आत्महत्या 

सावकारीला कंटाळून एका महिलेने मंत्रालयाच्या समोर केली आत्महत्या 

ठळक मुद्देपोलिसांनी वेळीच या महिलेला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.शारदा अरूण कांबळे ( वय ४५ ) लाल डोंगर चेंबूर येथे राहणाऱ्या या महिलेवर सावकारी कर्ज आहे.त्याच वेळेस मंत्रालयाच्या गार्डन प्रवेशद्वारावर सुरक्षेवर तैनात असलेल्या पोलीसांनी या महिलेला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

मुंबई - सावकारी कर्जाला कंटाळून एका  महिलेने आज दुपारी मंत्रालयाच्या गार्डन प्रवेशद्वाराजवळ अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच या महिलेला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

शारदा अरूण कांबळे ( वय ४५ ) लाल डोंगर चेंबूर येथे राहणाऱ्या या महिलेवर सावकारी कर्ज आहे. त्याचा वाद न्यायालयात सुरू असून या महिलेने आज दुपारी मंत्रालयाच्या गार्डन प्रवेद्वाराजवळ सोबत बाटलीत आणलेले रॅाकेल अंगावर ओतून घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच वेळेस मंत्रालयाच्या गार्डन प्रवेशद्वारावर सुरक्षेवर तैनात असलेल्या पोलीसांनी या महिलेला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. या महिलेला मरीन ड्राईव्ह पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास मरीन ड्राईव्ह पोलीस करीत आहेत.

Web Title: A woman allegedly committed suicide in front of the ministry