चारित्र्यावर संशय घेणाऱ्या मूकबधिर पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला काटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 21:59 IST2022-02-01T21:58:53+5:302022-02-01T21:59:24+5:30
Murder Case : या घटनेच्या काही तासांतच हा प्रकार उघडकीस आला आहे. तर पत्नीचा प्रियकर अद्याप फरार आहे. ज्यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

चारित्र्यावर संशय घेणाऱ्या मूकबधिर पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला काटा
शहडोल - मध्य प्रदेशातील शहडोलमध्ये एका प्रकरणात पत्नीने प्रियकरासह मूकबधिर पतीची हत्या केली. आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराने मूकबधिर पतीचा गळा आवळून खून केला आहे. या प्रकरणी शहडोल पोलिसांनी पतीची हत्या करणाऱ्या पत्नीला अटक केली असून या घटनेच्या काही तासांतच हा प्रकार उघडकीस आला आहे. तर पत्नीचा प्रियकर अद्याप फरार आहे. ज्यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
खरं तर हे प्रकरण शहडोलच्या सिंहपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बोदरी गावातील आहे. तलावाजवळ मूकबधिर महेंद्र पटेल मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती तेथे खेळणाऱ्या मुलांनी नातेवाइकांना दिली. ही बाब लक्षात येताच सिंगपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहिले असता, मृताच्या मानेवर जखमेच्या खुणा होत्या, मयत महेंद्र पटेल कालपासून बेपत्ता होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना मृताची पत्नी राम प्यारी हिच्यावर संशय आला. चौकशीत पत्नीने गुन्ह्याची कबुली देत सर्व गुपिते उघड केली.
मृताची पत्नी राम प्यारी हिने पोलिसांना सांगितले की, तिचा पती तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत असे, तिने प्रियकर संदीप पटेल याच्यासोबत मिळून मूकबधिर पतीचा गळा दाबून खून केला. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीला अटक करून न्यायालयात हजर केले आणि तिची कारागृहात रवानगी केली. त्याचवेळी प्रियकर संदीप अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. ज्याचा पोलीस शोध घेत आहेत.
घटनेची माहिती देताना डीएसपी सोनाली गुप्ता यांनी सांगितले की, महेंद्र पत्नी रामप्यारीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करत असे. यावरून रामप्यारीने तिचा प्रियकर संदीप पटेल याच्यासोबत मिळून महेंद्रचा गळा आवळून खून केला आहे.