ड्रग्ज प्रकरणी वारंवार वक्तव्य करणाऱ्या कंगनाला एनसीबी चौकशीसाठी बोलवणार का ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 20:50 IST2020-09-05T20:49:22+5:302020-09-05T20:50:00+5:30
आता असे दिसते आहे की, कंगना सहकार्य करण्यास तयार आहे, परंतु एनसीबीने मनावर घेतलेले नाही.

ड्रग्ज प्रकरणी वारंवार वक्तव्य करणाऱ्या कंगनाला एनसीबी चौकशीसाठी बोलवणार का ?
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात शनिवार हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो. रियाचे भाऊ शोविक आणि सॅम्युअल मिरांडा यांना एनसीबीच्या कोठडीत ४ चार दिवसांसाठी पाठविण्यात आले आहे. किल्ला कोर्टाच्या निर्णयानंतर शोविकला मोठा धक्का बसला. कोर्टाने एनसीबीने केलेली मागणी मान्य केली असून शोविक आणि मिरंडा यांना 9 सप्टेंबरपर्यंत रिमांडवर पाठविले आहे. अशा परिस्थितीत आता एनसीबी त्याच्या तपासाची व्याप्ती वाढवणार आहे. बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणी वारंवार वक्तव्य करणाऱ्या कंगना राणौत हिची एनसीबी चौकशी करू शकते.
कंगना राणौत एनसीबीला सहकार्य करेल का?
पण प्रश्न असा आहे की या तपासणीत अभिनेत्री कंगना राणौत देखील समावेश असेल का? कंगना राणौतने बॉलिवूडमध्ये होणाऱ्या ड्रग पार्टीबद्दल खुलेपणाने भाष्य केले आहे. बॉलिवूडचे अनेक सेलेब्स ड्रग्ज घेतात असे ती म्हणाली आहे. ती स्वत: म्हणाली होती की, तपास यंत्रणांना सर्व प्रकारे सहकार्य करण्यास तयार आहेत. आता असे दिसते आहे की, कंगना सहकार्य करण्यास तयार आहे, परंतु एनसीबीने मनावर घेतलेले नाही.
एनसीबीने कंगनासंदर्भात दिले स्पष्टीकरण
या प्रकरणाचा कंगना राणौतशी काही संबंध नाही, असे एनसीबीच्या वतीने स्पष्टपणे सांगितले गेले आहे. या प्रकरणात तिचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही. यासंदर्भात साऊथ - वेस्टर्न राजनचे डेप्युटी डीजी मुठा अशोक जैन म्हणतात की, कोणास चौकशीसाठी बोलवायचे याचा अंदाज लावू नका. अभिनेत्री कंगना राणौतचा या प्रकरणाशी काही संबंध नाही. तिने काही माहिती दिल्यास एनसीबी त्याची चौकशी करेल. एनसीबी या ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित सर्व लोकांना समन्स पाठवेल आणि त्यांना चौकशीत सामील होण्यासाठी बोलावेल.
अशा परिस्थितीत एनसीबी आता कंगनाला कॉल करणार नाही. परंतु, कंगना नक्कीच तिच्या वतीने माहिती देऊ शकेल. आता हे दिसून येईल की सोशल मीडियावर सतत मोठे खुलासे आणि दावे करणारी कंगना एनसीबीला काही ठाम पुरावे देण्यास काम करेल की नाही?, अशी माहिती आजतकने दिली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार
सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला
Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा
बापरे! ९० हजाराहून अधिक तरुणांनी २०१९ मध्ये केली आत्महत्या, पहा NCRB चा अहवाल
महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात वाढ, सीआयडीचा क्राईम इन महाराष्ट्र २०१८ अहवाल जाहिर
मोठी बातमी! अखेर रियाचा भाऊ शोविक आणि मिरांडाला एनसीबीने केली अटक
Sushant Singh Rajput Case : शोविक आणि सॅम्युअलला ९ सप्टेंबरपर्यंत NCBची कोठडी