शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

पिंपरी शहरातील वाहनचोरीमागील ‘मास्टर माइंड’ पोलिसांच्या जाळ्यात अडकणार का..? 

By महेश गलांडे | Published: July 17, 2020 3:28 PM

शहरात रोज तीन ते चार घटना वाहन चोरीच्या घटना घडत आहे।

ठळक मुद्देपार्किंग केलेली व लॉक असलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना दापोडी येथे घडली

पिंपरी : शहरात दुचाकीचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दिवसाला किमान दोन दुचाकीचोरीला जाण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. शुक्रवारीदेखील तीन दुचाकीची चोरी झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदली गेली आहे. शहरात दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला तातडीने अटक करावी, अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे. या समस्येमुळे त्यांच्या डोकेदुखीत भर पडली आहे. पार्किंग केलेली व लॉक असलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना दापोडी येथे घडली. याप्रकरणी संजय रावसाहेब पाटील (वय ४५, रा. गणेशनगर, बोपखेल) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची काळ्या रंगाची स्प्लेंडर दापोडी येथील सीएमई गेटसमोर पार्किंग केली असताना चोरीला गेली. अज्ञात चोरट्याने ती दुचाकी लॉक केली असताना ते तोडून चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दुसरी घटनादेखील भोसरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. १३ जुलै रोजी भोसरी गावातील राजमाता उड्डाणपुलाखालून फिर्यादी चालक्येल पोतन थॉमस यांची झेन कार चोरीला गेली. कार पार्किंगमध्ये लॉक केली होती. या वेळी अज्ञात चोरट्याने ती पळवली. तिसरी घटना चाकण पोलीस स्टेशन हद्दीत घडली. आळंदी फाटा येथून ११ जुलै रोजी सकाळी साडेदहा ते पावणेअकराच्या सुमारास फिर्यादी किरण तुकाराम घुगे (वय २८, रा. मोशी) यांची प्लॅटिना चोरीला गेल्याची घटना घडली. फिर्यादी यांनी आळंदी फाट्याच्या कॉर्नरजवळ दुचाकी लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने लॉक तोडून चोरल्याचे समोर आले आहे. 

या कृत्यामागील मास्टर माइंडपर्यंत पोलीस पोहचणार का? उद्योगनगरीतील वाहन चोरट्यांच्या ‘उद्योगामुळे’ दुचाकीस्वारांचे धाबे दणाणले आहेत. शहरात दररोज तीन ते चार दुचाकी व चारचाकी चोरीच्या घटना घडत आहेत. यामागे कुणा मोठ्या गुन्हेगाराचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, अद्याप त्याचा शोध त्यांना लागलेला नाही. या सर्व घटनांमागील मास्टर माइंड कोण? हे शोधणे येत्या काळात पोलिसांपुढील मोठे आव्हान आहे. अशा ‘अज्ञात’ चोरट्यांना बेड्या ठोकल्यास वाहनचालकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होण्यास मदत होणार आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडtwo wheelerदुचाकीfour wheelerफोर व्हीलरThiefचोरPoliceपोलिस