पत्नीचे अनैतिक संबंध, पतीने गळा दाबून प्रियकराची केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 20:09 IST2022-02-27T19:56:14+5:302022-02-27T20:09:09+5:30
Wife's immoral relationship : नोएडा फेस टू भागातील एका घरात अज्ञात भाडेकरूचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यास सुरुवात केली. याबाबत लोकांना विचारपूस करण्यात आली.

पत्नीचे अनैतिक संबंध, पतीने गळा दाबून प्रियकराची केली हत्या
उत्तर प्रदेशातील नोएडा येथे एका खुनाच्या गुन्ह्याची उकल करताना पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मृताचे पत्नीशी अनैतिक संबंध असल्याने आरोपीने हा खून केला होता. या खून प्रकरणाची उकल करण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. तर, नोएडा फेस टू भागातील एका घरात अज्ञात भाडेकरूचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यास सुरुवात केली. याबाबत लोकांना विचारपूस करण्यात आली.
हा मृतदेह संजीव यादव नावाच्या व्यक्तीचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, जो मूळचा इटावा येथील असून फेस टू या घरात भाड्याने राहत होता. तपासादरम्यान पोलिसांना एक सुगावा लागला आणि मृताचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी महिला आणि तिच्या पतीकडे चौकशी केली, त्यानंतर संपूर्ण प्रकरण समोर आले. पोलिसांनी हत्येप्रकरणी आरोपीला अटक केली.
वहिनीसोबत अवैध संबंध, विरोध केल्याने पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे तुकडे
चौकशीदरम्यान आरोपी चंद्रभानने पोलिसांना सांगितले की, त्याच्या पत्नीचे संजीव यादवसोबत अवैध संबंध आहेत. त्याने संजीव आणि त्याच्या पत्नीला अनेकदा समजावले. पण दोघेही ऐकत नव्हते. एकदा त्याने दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते.ही गोष्ट त्याला सहन होत नव्हती. त्यानंतर तो संजीव यादव याच्या घरी पोहोचला आणि त्याने त्याची गळा आवळून हत्या केली.
पोलिसांनी आरोपी चंद्रभानला अटक केली असून त्याच्याकडून संजीव यादवचे आधारकार्ड आणि हायस्कूलची गुणपत्रिकाही जप्त केली आहे. असे सांगितले जात आहे की, चंद्रभानची पत्नी आणि मृत संजीव यादव हे आक्षेपार्ह अवस्थेत दिसले. त्यानंतर रागाच्या भरात त्याने संजीव यादव यांचा गळा आवळून खून केला.