रात्री प्रियकरासह खोलीत होती पत्नी; नंतर पती पोहोचला आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 19:46 IST2021-11-28T19:38:17+5:302021-11-28T19:46:05+5:30
Crime News :पत्नी आणि तिच्या प्रियकराने पतीवर हल्ला करत छतावरून उडी मारून पळ काढला. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून पत्नी आणि तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे.

रात्री प्रियकरासह खोलीत होती पत्नी; नंतर पती पोहोचला आणि मग...
अंबाला : हरियाणातील अंबाला जिल्ह्यात एक लाजीरवाणी घटना समोर आली आहे. रात्रीच्या अंधारात पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराला आपल्याच घरात रंगेहाथ पकडले. मात्र, पत्नी आणि तिच्या प्रियकराने पतीवर हल्ला करत छतावरून उडी मारून पळ काढला. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून पत्नी आणि तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत पीडित पतीने म्हटले आहे की, २४ नोव्हेंबर रोजी तो आपल्या खोलीत मुलांसोबत झोपला होता. बाळाच्या रडण्याच्या आवाजाने त्याला जाग आली. त्यावेळी त्याची पत्नी अंथरुणावर नसल्याचे त्याच्या लक्षात आले. दुसऱ्या खोलीत जाऊन पाहिले आणि खोलीचा दरवाजा ठोठावला तर पत्नीने दरवाजा उघडला. त्याने आपल्या पत्नीला विचारले की, ती येथे काय करते आणि तिने या खोलीत झोपेत असल्याचे सांगितले.
ऑनलाईन प्रेम नंतर लग्न; पत्नीला सोडून छूमंतर होणाऱ्या पतीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
८० वर्षाच्या वृद्धाने वृद्ध महिलेला बनवले वासनेचे शिकार अन् केला बलात्कार
मात्र, तिच्या पतीला संशय आल्याने त्याने संपूर्ण दरवाजा उघडला असता त्याच्याच गावातील अक्षय दरवाजाच्या मागे उभा असल्याचे दिसले. दोघांनी पतीला खाली ढकलले. अक्षयने त्याच्या डोक्यात वस्तूने वार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. आवाजाने पीडित पतीचे पालकही जागे झाले. त्यामुळे पत्नी आणि प्रियकराने छतावरून उडी मारून पळ काढला. यानंतर त्यांनी दोघांचा शोध घेतला मात्र ते सापडला नाही. त्यानंतर त्याने ११२ वर कॉल केला.
पीडित नवऱ्याच्या म्हणण्यानुसार, पत्नीच्या या कृत्यामुळे गावात दोन-तीन महिन्यांपूर्वी पंचायत सभा झाली होती. ज्यामध्ये तिने माफी मागितली आणि भविष्यात असे न करण्यास सांगितले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.