८० वर्षाच्या वृद्धाने वृद्ध महिलेला बनवले वासनेचे शिकार अन् केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 03:32 PM2021-11-28T15:32:05+5:302021-11-28T15:32:32+5:30

Rape Case : ती मूळची महाराष्ट्राची असून गौतम मढियाजवळ ज्वाला सिंगच्या घरात भाड्याने राहत होती. ती घरात काम करून आपला उदरनिर्वाह करते. याठिकाणी आरोपीने तिच्यावर बलात्कार केला.

An 80-year-old man made an old woman a victim of lust and raped her | ८० वर्षाच्या वृद्धाने वृद्ध महिलेला बनवले वासनेचे शिकार अन् केला बलात्कार

८० वर्षाच्या वृद्धाने वृद्ध महिलेला बनवले वासनेचे शिकार अन् केला बलात्कार

Next

जबलपूर - मध्य प्रदेशातील जबलपूरमधून बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका ६५ वर्षीय व्यक्तीला ८० वर्षीय व्यक्तीने आपल्या वासनेची शिकार बनवले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली.

गढ़ा पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या पीडित वृद्ध महिलेने जेव्हा तिची वेदना मांडली तेव्हा पोलिसही आश्चर्यचकित झाले. ही महिला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील सेवानिवृत्त कर्मचारी आहे. ती मूळची महाराष्ट्राची असून गौतम मढियाजवळ ज्वाला सिंगच्या घरात भाड्याने राहत होती. ती घरात काम करून आपला उदरनिर्वाह करते. याठिकाणी आरोपीने तिच्यावर बलात्कार केला.

पीडितेने सांगितले की, ज्वाला सिंहने एके दिवशी तिच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. वृद्ध व्यक्ती तिच्यावर सतत बलात्कार करत असे. पहिल्यांदा जेव्हा त्याने तिला आपल्या वासनेचा शिकार बनवले. नंतर पीडितेने लाजेखातर कोणालाही सांगितले नाही. यानंतर वयोवृद्ध आरोपी पुन्हा पुन्हा वृद्ध महिलेवर बलात्कार करू लागला. हतबल झालेल्या वृद्ध महिलेने नंतर पोलीस ठाणे गाठले. 

त्याच्या छळाला कंटाळून अखेर वृद्ध महिलेने पोलीस ठाणे गाठले आणि गुन्हा दाखल केला. एसआय वीरेंद्र तिवारी यांनी सांगितले की, पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी ज्वाला सिंगला अटक केल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करत आहेत. महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. 

Web Title: An 80-year-old man made an old woman a victim of lust and raped her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app