विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पत्नीला खांबाला बांधून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 19:25 IST2022-05-01T19:16:22+5:302022-05-01T19:25:07+5:30

Extra Marital Affair : पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीडित महिलेचा पती दीपक राम याने शुक्रवारी पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सांगितले. त्यानंतर तीन मुले असलेल्या दाम्पत्याला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले.

Wife tied up and beaten on accused of extramarital affair | विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पत्नीला खांबाला बांधून मारहाण

विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पत्नीला खांबाला बांधून मारहाण

बिलासपूर: बिहारमधील रोहतास जिल्ह्यात एका महिलेला विजेच्या खांबाला बांधून मारहाण करण्यात आली. तिच्या पतीने तिचे गावातील अन्य एका पुरुषाशी अनैतिक प्रेमसंबंध असल्याचा आरोप केल्याचे पोलिसांनी आज सांगितले.
 

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीडित महिलेचा पती दीपक राम याने शुक्रवारी पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सांगितले. त्यानंतर तीन मुले असलेल्या दाम्पत्याला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले.

स्टेशन हाऊस ऑफिसरने (SHO) नंतर पोलीस स्टेशनमध्ये जोडप्याचे समुपदेशन केले, असे अधिकारी पुढे म्हणाले. मात्र, त्यांच्या गावी सिंघपूर येथे पोहोचल्यानंतर दीपक राम, त्याचे वडील शिवपूजन राम आणि कुटुंबातील इतर तीन सदस्यांनी महिलेला घराबाहेरील विजेच्या खांबाला बांधून बेदम मारहाण केली.

प्रियकराच्या वडिलांचा होता लग्नाला नकार, प्रेयसीने पोलीस स्टेशन गाठले अन् म्हणाली...

रोहतासचे पोलीस अधीक्षक आशिष भारती यांनी सांगितले की, पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन महिलेची सुटका केली. भारती पुढे म्हणाले, "या घटनेप्रकरणी तिचा पती आणि सासऱ्यांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे," पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Wife tied up and beaten on accused of extramarital affair