लग्नाला सहा महिनेही झाले नव्हते, अचानक एक दिवस पत्नी बेपत्ता, व्हॉट्सअपवर पतीला फोटो आला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 15:30 IST2025-09-05T15:29:24+5:302025-09-05T15:30:56+5:30
Crime News Whatsapp : नवऱ्याने बायकोला सगळीकडे शोधलं, पण ती कुठेच सापडली नाही. नंतर तो फोटो आला...

लग्नाला सहा महिनेही झाले नव्हते, अचानक एक दिवस पत्नी बेपत्ता, व्हॉट्सअपवर पतीला फोटो आला...
Crime News Whatsapp : बिहारमधील मुझफ्फरपूरमधून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथे लग्नाला अवघे साडेपाच महिने झाले असताना, एका पत्नीने तिच्या पतीची फसवणूक केली. तिने व्हॉट्सअपवर तिच्या पतीला मेसेज पाठवला. तिने लिहिले- माफ करा, मी माझ्या प्रियकराशी लग्न करणार आहे. हे पाहून नवऱ्याला धक्का बसला. त्याची पत्नी असे काही करू शकते यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. पतीने तात्काळ कुटुंबातील सदस्यांना याची माहिती दिली. त्यानंतर कळले की सून राणी घरातून ५३ हजार रुपये रोख आणि सुमारे १.७० लाख रुपये किमतीचे दागिने लंपास करून पळून गेली आहे. सारा प्रकार धक्कादायक होता. याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
नेमके काय घडले?
हे प्रकरण मिठनपुरा पोलिस स्टेशन परिसरातील आहे. तक्रारदार पतीने पोलिसांना सांगितले की, माझे लग्न साडेपाच महिन्यांपूर्वी शिवहर येथील एका मुलीशी झाले. सुरुवातीला सर्व काही ठीक चालले होते. पण गेल्या काही दिवसांपासून माझी पत्नी सतत एका अनोळखी नंबरवर फोनवर बोलत होती. मी फारसा संशय घेतला नाही, कारण मला वाटले की ती तिच्या मैत्रिणींशी बोलत असावी.
कॉलेजमध्ये जाते सांगून पसार
पती पुढे म्हणाला की, गुरुवारी माझ्या पत्नीने मला सांगितले की ती क्लब रोडवरील एका कॉलेजमध्ये जात आहे. मी तिला जाऊ दिले. पण दुपारची संध्याकाळ झाली आणि संध्याकाळची रात्र झाली. माझी पत्नी घरी परतली नाही तेव्हा मला शंका येऊ लागली. मी तिला फोन केले, पण तिने माझा एकही कॉल उचलला नाही. मी तिचा शोध घेतला पण ती सापडली नाही.
व्हॉट्सअपवर आला फोटो, मेसेज
नंतर एका अनोळखी नंबरवरून पतीला व्हॉट्सअॅपवर मेसेज आला. यामध्ये पत्नीने लिहिले होते, सॉरी. यासोबतच तिने एका मुलासोबतचा तिचा फोटो पाठवला. पत्नीने लिहिले होते की ती त्याच्याशी लग्न करणार आहे. तिने घरातून हजारो रुपयांची रोकड आणि लाखो रुपयांचे दागिनेही चोरून नेले. त्यामुळे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.