पत्नीने दिली पतीच्या हत्येची सुपारी; कुंकवाचा सौदा केला ५० हजार रुपयांत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 17:06 IST2021-06-24T17:05:29+5:302021-06-24T17:06:45+5:30

Wife plotting to kill husband : अवघ्या ५० हजार रुपयांत पत्नीने आपल्या पतीच्या आयुष्याचा सौदा केला.

wife plotting to kill husband coming between illegitimate relationship | पत्नीने दिली पतीच्या हत्येची सुपारी; कुंकवाचा सौदा केला ५० हजार रुपयांत 

पत्नीने दिली पतीच्या हत्येची सुपारी; कुंकवाचा सौदा केला ५० हजार रुपयांत 

ठळक मुद्देवास्तविक, ही बाब कटिहारच्या डेहरियाच्या भटटोलाची आहे. येथे २० जून रोजी रात्री झालेल्या ट्रक चालक धर्मेंद्र रविदास यांच्या हत्येचा खुलासा पोलिसांनी केला आहे.

कटिहार: बिहारच्या कटिहारमध्ये थरारक घटना समोर आली आहे. येथे एक पत्नी तिच्या पतीच्या हत्येची सुपारी दिली होती. अवैध शारीरिक संबंधांच्या इच्छेने सात जन्मांच्या नवऱ्याला पत्नीने ठार मारले. अवघ्या ५० हजार रुपयांत पत्नीने आपल्या पतीच्या आयुष्याचा सौदा केला.

वास्तविक, ही बाब कटिहारच्या डेहरियाच्या भटटोलाची आहे. येथे २० जून रोजी रात्री झालेल्या ट्रक चालक धर्मेंद्र रविदास यांच्या हत्येचा खुलासा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी सांगितले की, २० जूनच्या रात्री ट्रकचालक धर्मेंद्र रविदास घरात झोपला होता, तेव्हा दोन दरोडेखोरांनी घरात घुसून त्याला गोळ्या घालून ठार केले. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना पत्नीच्या भूमिकेबद्दल संशय आला. पोलिसांनी तपास सुरू केला असता पत्नीच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली. तेथून पोलिसांची संशयाची सुई पत्नीकडे वळली.

धर्मेंद्र रविदास यांची पत्नी संजूला यांचे राजू कुमार नावाच्या व्यक्ती सोबत ६ महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. महिनाभरापूर्वी दोघांनी धर्मेंद्रला ठार मारण्याचा कट रचला होता. प्रत्यक्षात पत्नीने पतीच्या नावावर बंधन बँकेकडून ९० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. तिच्या प्रियकराने तिला सांगितले होते की, पतीच्या निधनानंतर कर्ज माफ केले जाईल. त्यानंतर पत्नीने कर्जमाफी आणि बेकायदेशीर विवाहबाह्य संबंधात अडकलेल्या पतीचा जीव घेण्याचा कट रचला.

यानंतर पत्नी तिच्या प्रियकराच्या सांगण्यावरून पूर्णिया येथून सुपारी किलरला फोन करते आणि ५० हजार रुपये देऊन आपल्या पतीच्या हत्येची सुपारी देते. १८ हजार रुपये आगाऊ तिने दिले. पत्नीने मारेकऱ्यांना तिच्या पतीच्या झोपेत असल्याची माहिती दिली होती. पोलिसांनी हत्येत सामील झालेल्या पिस्तुल, २ काडतुसे, दुचाकी जप्त केली आहे. यासह आरोपींना अटक करुन तुरूंगात पाठविण्यात आले आहे.

Web Title: wife plotting to kill husband coming between illegitimate relationship