शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

अनैतिक संबंधातून पत्नीने केला पतीचा खून, बारामती तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 7:12 PM

पतीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची बतावणी करत अंत्यविधी उरकून टाकला..

ठळक मुद्देपोलिसी खाक्या दाखवताच गुन्हा केला कबूल

सुपे : अनैतिक संबंधातून पत्नीनेच पतीचा खून केल्याची घटना बारामती तालुक्यातील सुपे नजीक असणाऱ्या चोरमलेवस्तीवर घडली. गेल्या दहा दिवसांपूर्वी साप चावल्याची बतावणी करुन पत्नी व प्रियकराने अंत्यविधी केला. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच खून केल्याची माहिती समोर आली.         यासंदर्भात आरोपी पत्नी रुपाली कामा मदने आणि प्रियकर दादा कामा महानवर (रा. पाटस, ता. दौंड) यांनी कामा बापू मदने यांची तोंड दाबून अवघड जाग्यावर मारुन हत्या केली. या प्रकरणी आरोपींना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. दोघांना पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावन्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली.         भोंडवेवाडी गावच्या हद्दीत दत्तात्रय भोंडवे यांच्या शेतात बकरीबसण्यासाठी होती. यावेळी पत्नीच्या अनैतिक संबंधात पती कामा बापू मदने यांचा अडथळा होत होता. त्यामुळे पत्नीने प्रियकरासोबत पती कामा मदने यांचे तोंड दाबून तसेच लाथा मारुन जीवे मारले.मात्र, पती कामा यास सर्प चावल्याचा बनाव करुन पत्नी व प्रियकराने अंत्यविधी उरकण्यास सांगुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र याचा संशय कामाचा रामा बापू मदने यास आला.त्यामुळे त्याने पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार पत्नी व प्रियकराचे मोबाईल ‘टॅप’ करुन या दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडुन कसुन चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हयाची कबुली दिली. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बारामतीचे विभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. या आरोपींना कलम ३०२, २०१ आणि ३४ या प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास सपोनी सोमनाथ लांडे करीत आहेत.———————————

टॅग्स :BaramatiबारामतीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMurderखूनArrestअटक