शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

पत्नी रुग्णालयात, घरात पती अन् मुलाची आत्महत्या; उपचारासाठी पैसे नसल्याने उचलले टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 1:13 AM

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक सोनार हे पत्नी श्रद्धा व मुलगा परेश यांच्यासह आदर्शनगरात वास्तव्याला होते. पत्नी सराफ बाजारात दागिने पॉलिश करण्याचे काम करतात. दीपक सध्या घरीच होते तर मुलगा मतीमंद होता. (Jalgaon)

जळगाव: दवाखान्यात दाखल असलेल्या पत्नीच्या उपचारावर दीड लाख रुपये खर्च केले. यानंतरही आणखी पाच लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याने नैराश्यात आलेल्या दीपक रतीलाल सोनार (वय ६५) व मुलगा परेश (३४), या पिता-पूत्राने राहत्या घरातच विष घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगावच्या आदर्श नगरमध्ये घडली आहे. गुरुवारी रात्री ९ वाजता ही घटना उघडकीस आली. (Wife in hospital, husband and son commit suicide at home in Jalgaon)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक सोनार हे पत्नी श्रद्धा व मुलगा परेश यांच्यासह आदर्शनगरात वास्तव्याला होते. पत्नी सराफ बाजारात दागिने पॉलिश करण्याचे काम करतात. दीपक सध्या घरीच होते तर मुलगा मतीमंद होता. मुलगी रुपाली विवाहित असून नंदुरबारला सासरी असते. पत्नी श्रद्धा यांना निमोनिया व इतर आजार झाल्याने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारपासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दीड लाख रुपये खर्च झाले तरी प्रक्रुतीत सुधारणा होत नाही. हा दवाखान्याचा खर्च जावाई रुपेश सोनार यांनी केला. आता अजून पाच लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याने दीपक सोनार नैराश्यात आले होते, असे सांगण्यात येत आहे.

अशी उघड झाली घटना -मुलगी व जावई रुग्णालयात असताना दीपक सोनार यांना फोन करत होते, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने जावई घरी आले असता त्यांना सासरे व परेश मृतावस्थेत आढळून आले. या घटनेची शेजारी चर्चा होताच मनपा स्थायी समितीचे सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर तातडीने रामानंद नगर पोलिसांना कळविले. त्यानंतर रुग्णवाहिका आणून मृतदेह शासकीय रुग्णालयात रवाना केले. तेथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. 

दरम्यान रामानंदनगर पोलिस ठाण्याचे हवालदार सतीश डोलारे व सहकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला परंतु दोघांनी नेमके कोणते विषय घेतले हे समजू शकले नाही.

कोरोनाची टेस्ट निगेटिव्हदीपक सोनार यांच्या पत्नी श्रद्धा या अपेक्स या खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत त्यांना कोरोना असल्याचे सांगितले जात होते. याबाबत खात्री करण्यासाठी रुग्णालयाचे डॉ. समीर चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता श्रद्धा यांची अॅटीजन टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे, मात्र शुक्रवारी आरटीपीसीआर टेस्ट घेतली जाणार होती. निमोनिया गंभीर स्वरूपाचा असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचेही डॉ. चौधरी यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगावhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरPoliceपोलिस