बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 10:58 IST2025-07-05T10:58:45+5:302025-07-05T10:58:53+5:30
संभल जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेने तिच्या प्रियकरासह पती आणि दोन निष्पाप मुलांना मारण्याचा भयंकर कट रचला.

बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेने तिच्या प्रियकरासह पती आणि दोन निष्पाप मुलांना मारण्याचा भयंकर कट रचला. महिलेला फक्त तिच्या पतीपासून सुटका करून घ्यायची नव्हती तर त्याच्या दोन लहान मुलांनाही मारायचं होतं. या प्रकरणात पोलिसांनी महिलेला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
बहजोई पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. गोपाळ मिश्रा यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी नैना हिचे आशुतोष नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध आहेत. यामुळे नैनाने तिच्या पती आणि मुलांना मारण्याचा कट रचला. नैना आणि आशुतोष यांनी मिळून गोपाळ आणि त्याच्या दोन मुलांना दुधात विष मिसळून विष दिलं, परंतु सुदैवाने कुटुंबातील सर्व सदस्य वाचले.
पहिल्या प्रयत्नानंतर, दोघांनीही २ आणि ३ जुलैच्या मध्यरात्री दुसरा प्रयत्न केला. गोपाळ झोपलेला असताना नैना आणि आशुतोष यांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला. मात्र गोपाळ कसा तरी तिथून पळून गेला आणि त्याने शेजाऱ्यांना हा प्रकार सांगत आरडाओरडा सुरू केला. ज्यामुळे आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.
बहजोई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आणि नैना शर्मा आणि तिचा प्रियकर आशुतोष यांना अटक केली. एसएचओ हरीश कुमार यांच्या म्हणण्यानुसार, हत्येचा प्रयत्न आणि कट रचण्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस दोन्ही आरोपींची चौकशी करत आहेत. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.