पत्नीच्या अफेअरला कंटाळून हॉटेल मालकाची आत्महत्या, मृत्यूआधी रेकॉर्ड केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 10:17 IST2022-11-04T10:17:19+5:302022-11-04T10:17:47+5:30

Crime News : पोलिसांनी सांगितलं की, मृतकाच्या भावाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता चौकशी केली जात आहे.

Wife has affair and she beats me hotel owner committed suicide making video | पत्नीच्या अफेअरला कंटाळून हॉटेल मालकाची आत्महत्या, मृत्यूआधी रेकॉर्ड केला व्हिडीओ

पत्नीच्या अफेअरला कंटाळून हॉटेल मालकाची आत्महत्या, मृत्यूआधी रेकॉर्ड केला व्हिडीओ

Crime News :  राजस्थानच्या भीलवाडामध्ये पत्नीच्या अफेअरला कंटाळून एका हॉटेल मालकाने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येआधी हॉटेल मालकाने व्हिडीओ बनवला. यात त्याने सांगितलं की, त्याची पत्नी आणि तिचा बॉयफ्रेंड धमकी देतात. पोलिसांनी सांगितलं की, मृतकाच्या भावाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता चौकशी केली जात आहे.

पोलिसांनी सांगितलं की, मशीनी मार्केटमध्ये राहणारा 42 वर्षीय कमल कलवानीने रेल्वेसमोर येऊन आत्महत्या केली. कमलचा मृतदेह रेल्वे फाटकाजवळ आढळून आला. मृतकाकडे मोबाइल आढळून आला. ज्यामुळे त्याची ओळख पटली.

त्याच्या मोबाइलमध्ये एक व्हिडीओ आढळून आला. ज्यात त्याने तो पत्नीच्या अफेअरमुळे हैराण असल्याचं त्याने सांगितलं आहे. यात तो बोलला की, पत्नीचं अफेअर सुरू आहे. मी दोघांना रंगेहाथ पकडलं, तर ती म्हणाली की, तू काहीच करू शकत नाही. कायदा महिलांचा आहे.

तो म्हणाला की, पत्नीचा बॉयफ्रेंड आणि त्याच्या घरातील लोक मला धमक्या देत आहेत. तो म्हणाला आमचं 50 लाखांचं इन्कम आहे. आम्ही पोलिसांना पैसे देतो. पत्नी सतत भांडण करते, मारहाण करते. याला वैतागून तो आत्महत्या करत आहे.

पोलिसांनुसार, कमलचं त्याच्या पत्नीसोबत आणि तिच्या बॉयफ्रेंडसोबत वाद झाला होता. त्याने पोलिसात याची तक्रारही दाखल केली होती. कमलचं लग्न 18 वर्षाआधी झालं होतं. त्याना दोन मुली आणि एक मुलगा आहे.

Web Title: Wife has affair and she beats me hotel owner committed suicide making video