संतापजनक! ..अन् 10 वर्षांचं नातं काही मिनिटांत तुटलं; चहा केला नाही म्हणून पतीने दिला तलाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 16:17 IST2021-04-06T16:06:28+5:302021-04-06T16:17:57+5:30
Triple Talaq : पत्नीने चहा तयार करून दिला नाही म्हणून पतीने तिला तलाक दिल्याचा भयंकर प्रकार घडला आहे.

संतापजनक! ..अन् 10 वर्षांचं नातं काही मिनिटांत तुटलं; चहा केला नाही म्हणून पतीने दिला तलाक
नवी दिल्ली - देशात महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. गाझियाबादमधील लोनी येथे तिहेरी तलाकची घटना समोर आली आहे. पत्नीने चहा तयार करून दिला नाही म्हणून पतीने तिला तलाक दिल्याचा भयंकर प्रकार घडला आहे. पीडितेने वकिलांमार्फत कोर्टात अर्ज दाखल करून न्याय देण्याची विनंती केली आहे. पीडितेच्या वकिलांच्या माहितीनुसार, लोनी येथे राहणाऱ्या शबनमचं दहा वर्षांपूर्वी रईसुद्दीन याच्यासोबत लग्न झालं होतं. त्यांना चार मुलं आहेत.
रईसुद्दीन हा रिक्षा चालवतो. 13 जानेवारी रोजी त्याने नेहमीप्रमाणे पत्नीला चहा करण्यास सांगितलं. मात्र शबनमने चहा तयार करण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात रईसुद्दीन याने तिला तलाक दिला आणि त्यानंतर रिक्षा घेऊन घराबाहेर निघून गेला. संध्याकाळी रईसुद्दीन घरी आला. पत्नीने त्याची समजूत काढण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र त्याने काहीही ऐकून घेतलं नाही. महिलेने त्याच्याविरोधात पोलिसांतही तक्रार दाखल केली. पण पोलिसांनी त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही असा महिलेचा आरोप आहे. अखेर न्याय मिळावा यासाठी तिने कोर्टाचा धाव घेतली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
संतापजनक! मुलीची प्रकृती गंभीर, आरोपी तरुणाला अटकhttps://t.co/lKGQPEM34i#Crime#crimenews#Rape#Ayodhya#Police#UttarPradesh
— Lokmat (@MiLOKMAT) April 5, 2021
उत्तर प्रदेश हादरलं! अयोध्येत 4 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, परिसरात खळबळ
उत्तर प्रदेश एका भयंकर घटनेने पुन्हा एकदा हादरलं आहे. अयोध्येत 4 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेशच्या अयोध्या जिल्ह्यातील रुदौली परिसरातील एका गावात चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गावातील तरुणानेच हे कृत्य केलं आहे. मुलीची प्रकृती गंभीर असून तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
"काँग्रेस आमदाराच्या मुलाने बलात्कार केला, जीवे मारण्याची दिली धमकी", महिला कार्यकर्तीचा गंभीर आरोप
मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. काँग्रेस आमदाराच्या मुलाविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच आमदाराच्या मुलाने जीवे मारण्याची देखील धमकी दिल्याचा गंभीर आरोप युवा काँग्रेसच्या एका महिला कार्यकर्तीने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बडनगर भागातील काँग्रेसचे आमदार मुरली मोरवाल यांचा मुलगा करण मोरवाल याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करणने लग्नाचं आमिष दाखवत फेब्रुवारी महिन्यात बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
धक्कादायक! लग्नाचं आमिष दाखवून केला बलात्कार, महिला कार्यकर्तीने पोलिसांत केली तक्रारhttps://t.co/GJW2K2Ysbd#crime#crimesnews#Congress#Rape#Policepic.twitter.com/WO04C2tX84
— Lokmat (@MiLOKMAT) April 3, 2021