धक्कादायक! ...म्हणून पत्नीने पती झोपेत असताना कापला त्याचा प्रायव्हेट पार्ट, नंतर केली त्याची हत्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 11:52 IST2021-06-25T11:52:07+5:302021-06-25T11:52:31+5:30

पोलिसांनुसार, शिकारपूर गावात वकिल रफीक अहमद आपल्या घरात मृतावस्थेत आढळून आले. पोलिसांनी परिवारातील लोकांना याची माहिती दिली.

UP : Wife cut her husband private part and killed him | धक्कादायक! ...म्हणून पत्नीने पती झोपेत असताना कापला त्याचा प्रायव्हेट पार्ट, नंतर केली त्याची हत्या!

धक्कादायक! ...म्हणून पत्नीने पती झोपेत असताना कापला त्याचा प्रायव्हेट पार्ट, नंतर केली त्याची हत्या!

उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमधून वटपौर्णिमेच्या दुसऱ्याच दिवशी पत्नीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका पत्नीने भयावह पद्धतीने पतीला यमसदनी धाडलं. ही घटना शिकारपूर गावातील आहे. इथे पत्नीने पती झोपते असतानाच त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला आणि त्यानंतर त्याची हत्या केली.

स्थानिक लोकांनुसार, महिला तिच्या पतीच्या बाहेरच्या लफड्यांमुळे वैतागली होती. त्यामुळेच तिने हे कृत्य केल्याचं समजतं. पोलिसांनी आरोपी पत्नीला ताब्यात घेतलं असून प्रकरणाची चौकशी केली जात आहे. (हे पण वाचा : १६ वर्षीय विद्यार्थ्याच्या प्रेमात वेडी झाली महिला शिक्षिका; त्यानंतर जे काही केलं, प्रकरण थेट कोर्टात पोहचलं)

पोलिसांनुसार, शिकारपूर गावात वकिल रफीक अहमद आपल्या घरात मृतावस्थेत आढळून आले. पोलिसांनी परिवारातील लोकांना याची माहिती दिली. त्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह पोस्टमार्टमला पाठवला. पोस्टमार्टम दरम्यान समोर आलं की, रफीक अहमद याचा प्रायव्हेट पार्ट कापलेला आहे. यानंतर पोलिसांनी रफीकची पत्नी हाजराची चौकशी केली.

पोलिसांच्या चौकशी दरम्यान हाजराने कबूल केलं की, वकिल रफीक अहमदसोबत तिचं लग्न झालं होतं. पण रफीकने दुसरंही लग्न केलं होतं. मात्र, काही कारणाने दुसरी पत्नी रफीकला सोडून गेली होती. त्यामुळे त्याला तिसरं लग्न करायचं होतं. 

हाजराने सांगितलं की, तिने पतीच्या तिसऱ्या लग्नाला विरोध केला होता. यावर रागावलेल्या  रफीकने हाजराला मारहाण केली होती. याच गोष्टीला वैतागून हाजराने पती झोपेत असताना त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला आणि त्याची हत्या केली.

पोलीस अधिकारी जितेंद्र तेवतिया यांच्यानुसार, पतीच्या अय्याशीला कंटाळून त्याची पहिली पत्नी हाजराने रफीक अहमद याचं गुप्तांग कापून त्याची हत्या केली. पत्नीला अटक करण्यात आली असून पुढील कारवाई केली जात आहे.
 

Web Title: UP : Wife cut her husband private part and killed him