चारित्र्यावर संशय घेत केलेल्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; छळ प्रकरणी गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 04:55 PM2019-02-20T16:55:20+5:302019-02-20T16:56:27+5:30

चारित्र्यावर संशय घेत , तू काळी आहेस असे चिडवुन विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ केला. तसेच तिला मारहाण मारहाण करण्यात आली

Wife aborted due to beaten by husband ; filed the complaint | चारित्र्यावर संशय घेत केलेल्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; छळ प्रकरणी गुन्हा दाखल 

चारित्र्यावर संशय घेत केलेल्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; छळ प्रकरणी गुन्हा दाखल 

googlenewsNext

पिंपरी : चारित्र्यावर संशय घेत , तू काळी आहेस असे चिडवुन विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ केला. तसेच तिला मारहाण मारहाण करण्यात आली. त्यात तिचा गर्भपात झाला. या प्रकरणी ३१ वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळीविरूद्ध फिर्याद दाखल केली आहे. 
   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश संगम (पती), विमल संगम (सासू), सरिता संगम (नणंद), बलराज संगम (चुलत सासरे) सर्व राहणार औंध रूग्णालय कर्मचारी वसाहत या चार जणांविरूद्ध फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फियार्दी महिलेचा निलेश संगम याच्याशी २०१७ मध्ये विवाह झाला.  लग्नानंतर त्यांचा संसार चांगल्या पद्धतीने सुरु असताना, सासू, सासरे सुनेचा छळ करू लागले. पतीसुद्धा मारहाण करू लागला. तू काळी आहेस, दिसायला चांगली नाहीस, असे टोमणे मारून तिच्या चारित्र्यावर संशय घेत सासरच्या मंडळीकडून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ  करण्यात आला. पतीने केलेल्या मारहाणीत गर्भपात झाल्याचे महिलेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पतीसह सासू, नणंद आणि चुलत सासरे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. 
       पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ वर्षीय महिलेचा २०१७ मध्ये निलेश संगम याच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर त्यांचा संसार सुखात सुरु होता. मात्र, काही दिवसांनी सासरच्या मंडळींकडून छळ सुरु झाला. तू काळी आहेस, असे टोमणे सासू, चुलत सासरे, नणंद आणि पती तिला मारत होते. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पैसे आणले नाहीत म्हणून तिला नेहमी मारहाण होत असे. पत्नीने माहेरुन पैसे आणले नाहीत म्हणून निलेशने तिला बेदम मारहाण केली. तसेच  भिंतीवर ढकलून दिले. त्यात तिच्या पोटाला  धक्का लागल्याने गर्भपात झाला. याप्रकरणी पतीसह सासू , सासरे, नणंद, चूलत  सासरे यांच्याविरोधात सांगवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.

Web Title: Wife aborted due to beaten by husband ; filed the complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.