शेतात पाणी का सोडले?, जाब विचारल्याने डोक्यात मारला लोखंडी रॉड अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 05:14 PM2021-11-28T17:14:24+5:302021-11-28T17:15:37+5:30

Murder Case : उदगीर तालुक्यातील घटना; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

Why water was released in the field? arise question, irod rod put on head and murdered | शेतात पाणी का सोडले?, जाब विचारल्याने डोक्यात मारला लोखंडी रॉड अन्...

शेतात पाणी का सोडले?, जाब विचारल्याने डोक्यात मारला लोखंडी रॉड अन्...

Next

उदगीर (जि. लातूर) : तालुक्यातील लोणी येथील शेत शिवारात शेजाऱ्यास शेतात पाणी का सोडले, म्हणून विचारणा केली असता डोक्यात लोखंडी रॉड मारला. यामध्ये जखमी झालेल्या एकाचा सोलापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत शनिवारी रात्री उशिरा चौघांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, फिर्यादी सीता माधव केंद्रे (रा. लोणी, ता. उदगीर) हिचे पती माधव ऊर्फ महादेव बालाजी केंद्रे (३५) हे गुरुवारी सकाळी शेतात ट्रॅक्टरच्या साहाय्याने काम करीत होते. तेव्हा त्यांच्या शेताशेजारील राम केंद्रे यांच्या शेतातील पाणी फिर्यादीच्या शेतात आल्याने माधव केंद्रे यांचे ट्रॅक्टर फसले. त्यामुळे त्यांनी शेतात पाणी का सोडले? म्हणून विचारणा केली असता, वादावादी झाली. दरम्यान, त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. त्याचबरोबर छातीत, हातावर, खुब्यावर मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शनिवारी त्यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.

याबाबत सीता माधव केंद्रे यांच्या फिर्यादीवरुन राम भाऊराव केंद्रे, छाया राम केंद्रे, आकाश राम केंद्रे, विकास राम केंद्रे (सर्व रा. लोणी ता. उदगीर) यांच्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये खुनाचा गुन्हा रात्री उशिरा दाखल करण्यात आला.

Web Title: Why water was released in the field? arise question, irod rod put on head and murdered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.