त्यामुळेच कैद्यांनी केली पाकिस्तानी कैद्याची हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 21:32 IST2019-02-21T21:30:11+5:302019-02-21T21:32:38+5:30

जयपूरमध्ये भारतीय कैद्यांनी एका पाकिस्तानी कैद्याचा पुलवामा हल्ल्याचा संताप डोक्यात ठेवून खून केला आहे.

That is why prisoners killed the Pakistani prisoner | त्यामुळेच कैद्यांनी केली पाकिस्तानी कैद्याची हत्या 

त्यामुळेच कैद्यांनी केली पाकिस्तानी कैद्याची हत्या 

जयपूर - पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान संबंध पुन्हा एकदा ताणले आहेत. भारतात पाकिस्तानच्या या दहशतवादी कारवाईमुळे तीव्र संतापाची लाट उसळली. पाकिस्तानच्या विरोधातील हा संताप भारतातील तुरुंगातही पाहायला मिळाला आहे. जयपूरमध्ये भारतीय कैद्यांनी एका पाकिस्तानी कैद्याचा पुलवामा हल्ल्याचा संताप डोक्यात ठेवून खून केला आहे.

भारतात केलेल्या गुन्ह्यांमुळे मूळचा पाकिस्तानचा नागरिक असणाऱ्या कैद्याला जयपूरच्या तुरूंगात ठेवण्यात आले होते. तो मूळचा पाकिस्तानी असल्याची माहिती आधीपासूनच इतर भारतीय कैद्यांना होती. देशातील ४० जवान पाकिस्तानने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाल्याची माहिती तुरुंगातल्या कैद्यांना मिळाल्यानंतर त्यांना पाकिस्तानबद्दल राग अनावर झाला आणि त्यांनी त्या पाकिस्तानी कैद्याला ठार केले. दरम्यान या घटने बाबत पोलीस महासंचालक एन.आर.के रेड्डी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Web Title: That is why prisoners killed the Pakistani prisoner