शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या घरी का आला? असं विचारत भाच्याने मामाची सपासप वार करून केली हत्या   

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 19:31 IST

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक मामा शालीग्राम नारायण कंटाळे हा माझ्या घरी का आला या क्षुल्लक कारणावरून मामा-भाच्यात वाद झाला

ठळक मुद्देशालीग्राम नारायण कंटाळे (७०) रा. कारंजा असे  मृतकाचे नाव असून, अक्षय प्रल्हाद माकोडे (२२) रा कुपटी असे आरोपीचे नाव आहे.सचिन नारायण ढोके (३०) रा. कुपटी यांच्या फिर्यादीवरून आरोपी अक्षय प्रल्हाद माकोडे याच्या विरूध्द भांदवीच्या कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

बांबर्डा कानकिरड (वाशिम) : मामा घरी का आला या क्षुल्लक कारणावरून भाच्याने सुरीने सपासप वार करून मामाची हत्या केल्याची घटना कुपटी येथे २५ जून रोजी सकाळच्या सुमारास घडली. शालीग्राम नारायण कंटाळे (७०) रा. कारंजा असे  मृतकाचे नाव असून, अक्षय प्रल्हाद माकोडे (२२) रा कुपटी असे आरोपीचे नाव आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक मामा शालीग्राम नारायण कंटाळे हा माझ्या घरी का आला या क्षुल्लक कारणावरून मामा-भाच्यात वाद झाला. पुढे हा वाद विकोपाला जाऊन वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. भाचा अक्षय माकोडे याने मामा शालीग्राम कंटाळे यांच्या पोटावर, पाठीवर व मानेवर सुरीने सपासप वार केले. जखमी अवस्थेत मामाला उपचारासाठी कामरगाव येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अमरावती येथे पाठविण्यात आले. अमरावती येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सचिन नारायण ढोके (३०) रा. कुपटी यांच्या फिर्यादीवरून आरोपी अक्षय प्रल्हाद माकोडे याच्या विरूध्द भांदवीच्या कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. कामरगाव पोलीस चैकीतील सहायक पोलीस उपनिरीक्षक गजानन कदम, रविंद्र राजगुरे व आकाश खंडारे यांनी आरोपीला तातडीने अटक केली. घटनेचा अधिक तपास धनज पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार पोलीस उपनिरीक्षक कपील म्हस्के यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. धनज पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शिरसोली येथील हत्येच्या घटनेच्या बातमीची शाई वाळण्यापूर्वीच दोन दिवसात दुसरी हत्या झाली.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

नग्नावस्थेत फ्रिजमध्ये आढळले महिलेचे अर्धवट शरीर, बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याची शक्यता 

 

Shocking! भारत-चीन सीमेवर IES अधिकारी बेपत्ता, घरात सुरू होती लगीनघाई

 

लज्जास्पद! अपहरण करून मुलीवर बलात्कार; चौघांना अटक, मुख्य आरोपी भाजपा पंच फरार

 

विवस्त्र करून तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात

 

थरारक! दुचाकी पार्किंगच्या वादातून महिलेची केली चाकू भोसकून हत्या 

 

खळबळजनक! १६ वर्षांच्या TikToker तरुणीची आत्महत्या; रात्री मॅनेजरशी गाण्याबद्दल बोलली, अन्...

 

धक्कादायक! हालाखीच्या परिस्थितीला कंटाळून महिलेने मुलीला गळफास लावून स्वतःही केली आत्महत्या

 

उसन्या पैशाचा तगादा लावल्याने भाजीवाल्याची तारेने गळा आवळून हत्या 

टॅग्स :MurderखूनwashimवाशिमPoliceपोलिसArrestअटक