ऑफिसला जात असताना २८ वर्षीय तरुणी पाण्याच्या टँकरखाली येऊन मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 20:53 IST2019-04-02T20:52:31+5:302019-04-02T20:53:28+5:30
टँकर चालक मोहन रामचरण पाल (४३) याला पोलिसांनी अटक केली आहे.

ऑफिसला जात असताना २८ वर्षीय तरुणी पाण्याच्या टँकरखाली येऊन मृत्यू
मुंबई - लोअर परळ येथे राहणारी धर्मिष्ठा सिसोदिया (२८) ही ऑफिससाठी काल सकाळी १०.२० निघाली असताना माहीम कौजवे येथे भीषण अपघातात मृत पावली आहे. याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी टँकर चालकाला अटक करण्यात आली आहे.
लोअर परळ येथे एन. एम. जोशी मार्गावरील एका इमारतीत धर्मिष्ठा ही तारासेम मित्तल टॅलेंट मॅनेजमेंट या कंपनीत आर्टिस्ट मॅनेजर आणि क्लाईंट सर्व्हिस पर्सनल म्हणून अंधेरी येथील वर्सोवा परिसरात नोकरी करत होती. ती नेहमी ऑफिसला दुचाकी जात असे. नेहमीप्रमाणे ती दुचाकीने अंधेरी येथे ऑफिसला निघाला असताना तिचा तोल जाऊन ती माहीम कौजवे येथे रस्त्यावर पडली. दरम्यान भरधाव येणार पाण्याचा टँकर तिच्या अंगावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तात्काळ तिला भाभा रुग्णालयात नेण्यात आले. याबाबत माहीम पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. टँकर चालक मोहन रामचरण पाल (४३) याला पोलिसांनीअटक केली आहे.