शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
2
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
3
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
4
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
5
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
6
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
7
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
8
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
9
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
10
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
11
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
12
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!
13
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
14
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
15
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
16
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
17
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
18
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
19
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा

'कपड्यांशिवाय कुठे जाशील'... रुग्णालयात क्लिनरने गरोदर महिलेवर केला बलात्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 13:51 IST

Rape Case : शनिवारी रात्री 9 ते 10 वाजण्याच्या दरम्यान रुग्णालयात साफसफाईचे काम करणाऱ्या साहिल या सफाई कामगाराने बलात्काराची घटना घडवली. महिला रुग्ण वॉर्डातील बाथरूममध्ये जाऊन रक्त स्वच्छ करण्यासाठी कपडे बदलत असताना ही घटना घडली.

 

उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये मंडल रुग्णालयात एका गर्भवती महिलेवर रुग्णालयातील सफाई कामगाराने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही महिला तीन महिन्यांची गर्भवती होती. प्रकृती खालावल्याने त्यांना शनिवारी विभागीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.शनिवारी रात्री 9 ते 10 वाजण्याच्या दरम्यान रुग्णालयात साफसफाईचे काम करणाऱ्या साहिल या सफाई कामगाराने बलात्काराची घटना घडवली. महिला रुग्ण वॉर्डातील बाथरूममध्ये जाऊन रक्त स्वच्छ करण्यासाठी कपडे बदलत असताना ही घटना घडली.महिलेचा आरोप आहे की, त्यानंतर आरोपी सफाई कर्मचारी बाथरूममध्ये घुसला आणि आधी सर्व कपडे बाहेर फेकले आणि कपड्यांशिवाय कुठे जाणार असे सांगितले. यानंतर बळजबरीने तिचे तोंड बंद करून तिच्यावर बलात्कार केला. पीडित महिलेने आरडाओरडा केल्यावर काही महिला तेथे आल्या आणि आरोपी तरुण घटनास्थळावरून पळून गेले. घटनेनंतर महिलेला विभागीय रुग्णालयातून रेफर करण्यात आले. त्यानंतर ती तिच्या घरी गेली. घटनेच्या वेळी पती रुग्णालयात नव्हता. हा प्रकार पतीला समजताच त्याने महिलेला जिल्हा महिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली.

मदरशात शिकवणाऱ्या मुफ्तीनं ११ वर्षीय मुलावर १९ वेळा केला लैंगिक अत्याचाररुग्णासोबत घडलेल्या या खळबळजनक घटनेनंतर पोलीस-प्रशासनात खळबळ उडाली आहे. जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार आणि पोलीस अधीक्षक अजय कुमार सिंग हेही महिला रुग्णालयात पोहोचले. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर कारवाई सुरू असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षकांचे म्हणणे आहे. त्याचवेळी जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांनी आरोपीचा शोध सुरू असल्याचं सांगितलं.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशpregnant womanगर्भवती महिलाSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळ