पत्नी माहेरी गेली म्हणून संतापला पती, रागाच्या भरात केलं धक्कादायक कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 15:14 IST2021-09-28T15:14:25+5:302021-09-28T15:14:37+5:30

मोरानीतील दुर्गेशची पत्नी माहेरी गेल्यावर तो असा काही संतापला की, त्याने गावातील १६ बकरे आणि बकरींची हत्या केली. 

When wife went to her maternal home husband cut 16 goats necks | पत्नी माहेरी गेली म्हणून संतापला पती, रागाच्या भरात केलं धक्कादायक कृत्य

पत्नी माहेरी गेली म्हणून संतापला पती, रागाच्या भरात केलं धक्कादायक कृत्य

मध्य प्रदेशातील राजपूरमधील मोरानी गावात एका व्यक्तीच्या क्रूर कृत्याची घटना समोर आली आहे. इथे दुर्गेश नावाच्या एका व्यक्तीने मुक्या जनावरांसोबत असं काही केलं की, अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. मोरानीतील दुर्गेशची पत्नी माहेरी गेल्यावर तो असा काही संतापला की, त्याने गावातील १६ बकरे आणि बकरींची हत्या केली. 

मुक्या जनावरांना मारण्याआधी त्याचा स्वत:च्या भावासहीत गावातील इतर लोकांसोबत वाद झाला होता.  दुर्गेशला शंका होती की, त्याच्या पत्नीला लोकांनी काहीबाही सांगून तिला माहेरी पाठवलं आणि त्यानंतर दुर्गेशने धारदार हत्यार हातात घेऊन ज्यांच्या ज्यांच्यावर शंका होती त्यांच्या घरी गेला. 

दुर्गेश इतका संतापला होता की लोकांनी कसातरी लपून पळून जाऊन तर काहींनी स्वत:ला रूममध्ये बंद करून घेत आपला जीव वाचवला. पण जेव्हा दुर्गेशला कुणी सापडलं नाही तर त्याने या लोकांच्या मुक्या जनावरांना एकएक करून मारलं आणि आपल्या घरी गेला.

मुक्या जनावरांच्या हत्येनंतर लोकांनी हिंमत करून पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी दुर्गेशला ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर ते कारवाई करत आहेत. 
 

Web Title: When wife went to her maternal home husband cut 16 goats necks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.