आई झोपेतून जाग आल्यानंतर पाहते तर काय घडले होते अनर्थ; मुलाने लावून घेतला होता गळफास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 13:56 IST2021-05-18T13:47:09+5:302021-05-18T13:56:25+5:30
Suicide Case : ब्रह्मपुरी येथील घटना : आत्महत्येचे कारण अस्पष्ट

आई झोपेतून जाग आल्यानंतर पाहते तर काय घडले होते अनर्थ; मुलाने लावून घेतला होता गळफास
ब्रह्मपुरी(चंद्रपूर) : शहरातील साई पेट्रोल पंपमागे वास्तव्यास असलेल्या दिनेश रंधये (३२) या युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली आहे. कुटुंबात आई व दिनेश हे दोघेच होते. सोमवारी जेवण झाल्यानंतर नेहमीप्रमाणे दोघेही झोपी गेले.
दिनेशच्या मनामध्ये काही वेगळाच विचार सुरू होता. त्याने रात्री घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आईची झोप उघडली असता तिला दिनेश गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. आत्महत्येचे नेमके कारण कळले नसले तरी दिनेशचे लग्न जुळले होते. २४ एप्रिलला लग्न होणार होते. पण काही कारणास्तव पुढे ढकलले गेले. पुढची तारीख निश्चित नव्हती, अशी चर्चा आहे. माहिती मिळताच ब्रह्मपुरी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.