असला कसला बाप! पत्नीने जेवण न दिल्याचा राग काढला ९ महिन्याच्या चिमुकल्यावर; कुऱ्हाडीचा घातला घाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 16:04 IST2021-06-01T16:03:17+5:302021-06-01T16:04:12+5:30
Murder Case : हे प्रकरण कपू पोलिस स्टेशन परिसरातील करमाई गावचे आहे.

असला कसला बाप! पत्नीने जेवण न दिल्याचा राग काढला ९ महिन्याच्या चिमुकल्यावर; कुऱ्हाडीचा घातला घाव
रायगड: छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यात एका कलियुगातील पित्याने आपल्या ९ महिन्यांच्या मुलाची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक करुन तुरूंगात पाठविले. हे प्रकरण कपू पोलिस स्टेशन परिसरातील करमाई गावचे आहे.
शनिवारी सकाळी ११ वाजता ही घटना घडल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धनुराम मांझी याचे आपल्या पत्नीबरोबर खाण्यावरून वाद झाला होता. तो आपल्या बायकोकडे जेवण मागत होता. त्यावर पत्नीने त्याला थांबायला सांगितले. फक्त यामुळेच दोघांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात धनुरामने पत्नीला ठार मारण्यासाठी कुऱ्हाड उचलली आणि तिला ठार मारण्यासाठी तिच्या मागे धावत गेला.
भ्रष्ट कारभाराविषयी नाराजी; महापालिका मुख्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न https://t.co/Uid9GzbXuE
— Lokmat (@MiLOKMAT) June 1, 2021
आपला जीव वाचवून पत्नी कशी तरी पळून गेली. पण धनुरामने घरात झोपलेल्या ९ महिन्यांच्या मुलावर कुऱ्हाडीने घाव घातला. पोलिसांनी आरोपीला अटक करुन तुरूंगात पाठविले आणि त्याच्याविरूद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला.