आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 20:32 IST2025-06-29T20:31:41+5:302025-06-29T20:32:45+5:30

West Bengal Crime: कोलकाता लॉ कॉलेज बलात्कार घटनेतील मुख्य आरोपीची एक जुनी पोस्ट व्हायरल होत आहे.

West Bengal Crime: Demanded death penalty for the accused in RG kar case; Now he himself raped the young woman | आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

West Bengal Crime: पश्चिम बंगालमधील कलकत्ता लॉ कॉलेजमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने सुमारे एक वर्षापूर्वी कोलकाता येथेच झालेल्या आरजी कर बलात्कार आणि खून प्रकरणाच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. ८ ऑगस्ट २०२४ च्या रात्री मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे, अलिकडेच झालेल्या लॉ कॉलेज बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी मनोजित मिश्रा याने आरजी कर बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती.

पीडितेसाठी मागितलेला न्याय, आता स्वतः केला बलात्कार
लॉ कॉलेज बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी मनोजित मिश्राची एक जुनी फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गेल्या वर्षी कोलकाता येथे झालेल्या आरजी कर घटनेनंतर मनोजितने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून 'तात्काळ न्याय' आणि बलात्कारीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. त्याने त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले होते, 'बलात्काऱ्याला फाशी द्यावी, आम्हाला न्याय हवा आहे.' मात्र, आता त्याने स्वतःच एका तरुणीवर अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे.

काय आहे कोलकाता लॉ कॉलेज घटना?
कोलकात्याच्या लॉ कॉलेजमध्ये २५ जून रोजी झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आणि मुख्य आरोपी मनोजित मिश्रा, तसेच प्रमित मुखर्जी आणि झैद अहमद या दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त या प्रकरणात एका गार्डलाही अटक करण्यात आली आहे. 

विद्यार्थिनीला ओलीस ठेवून बलात्कार
तक्रारीनुसार, लॉ कॉलेजच्या २४ वर्षीय विद्यार्थिनीला कॅम्पसच्या डी वॉर्डमधील गार्ड रुममध्ये बोलावण्यात आले, जिथे आधीच तीन आरोपी उपस्थित होते. त्यानंतर, या लोकांनी तिला गार्ड रुममध्येच ओलीस ठेवले. पीडितेवर सुमारे तीन तास अत्याचार करण्यात आले. वैद्यकीय अहवालानुसार, पीडितेच्या मानेवर ओरखडे आढळून आले आहेत, तसेच मांड्या आणि छातीवर जखमा आढळल्या आहेत. गुन्हा केल्यानंतर आरोपीने तिला धमकावण्याचा प्रयत्न केला. घटनेच्या दुसऱ्या दिवशी, पीडितेने पोलिस स्टेशन गाठले आणि पोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती दिली.

आता या प्रकरणावर बरेच राजकारण सुरू आहे. मुख्य आरोपी मनोजित हा सत्ताधारी टीएमसीच्या विद्यार्थी संघटनेशी संबंधित होता. याशिवाय, आज तकशी झालेल्या संभाषणात त्याचा मित्र तीतस मन्ना याने खुलासा केला की, मनोजित यापूर्वीही कॉलेजमध्ये विनयभंग आणि मारहाणीच्या घटनांमध्ये सहभागी होता. तसेच, त्याच्याविरुद्ध विनयभंगाच्या एका प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. वाईट वर्तनामुळे विद्यार्थी संघटनेने त्याला कॉलेजमध्ये असताना बंदी घातली होती. तरीही तो कॅम्पसबाहेर गुंडगिरी आणि विद्यार्थिनींचा विनयभंग करत असे. 

Web Title: West Bengal Crime: Demanded death penalty for the accused in RG kar case; Now he himself raped the young woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.