प्रेयसीला भेटायला गेला अन् अचानक तिचा पती प्रकटला, हाकनाक जीव गमावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 14:49 IST2022-10-19T14:21:19+5:302022-10-19T14:49:06+5:30
हिरावाडी कमलनगर येथे राहणाऱ्या प्रियकराचा मृत्यू झाला आहे. याबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

प्रेयसीला भेटायला गेला अन् अचानक तिचा पती प्रकटला, हाकनाक जीव गमावला
अझहर शेख
नाशिक : म्हसरूळ भागात आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेलेल्या ३६ वर्षीय प्रियकराला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली. प्रेयसीच्या घरात गेल्यावर अचानक तिचा पती समोर आला त्याने दोघांना बघितले. यामुळे आपले बिंग फुटणार या भीतीपोटी त्याने थेट इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली उडी घेतली. गंभीर जखमी झालेल्या या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला.
हिरावाडी कमलनगर येथे राहणाऱ्या प्रियकराचा मृत्यू झाला आहे. याबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी हिरावाडी कमलनगरला राहणाऱ्या एका ३६ वर्षीय युवकाचे म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीत राहणाऱ्या एका विवाहित महिलेबरोबर प्रेम संबंध होते. दहा ते बारा दिवसांपूर्वी प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी थेट तिच्या घरी गेला होता मात्र त्याचवेळी अचानक तिचा पती दरवाजा समोर आल्याने आपण पकडले जाऊ व आपले बिंग फुटेल या भीतीपोटी त्याने थेट घराच्या तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली उडी मारली होती त्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला एका खाजगी रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले होते मात्र तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.