शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
3
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
4
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
5
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
6
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
7
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
9
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
10
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
11
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
12
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
13
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
14
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
15
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
16
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
17
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
18
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
19
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या

शाब्बास! या IPS अधिकाऱ्यांनी तपासचक्रं वेगाने फिरवली अन् केला ६९००० शिक्षक भरतीतील घोटाळा उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 20:09 IST

प्रयागराजचे आयपीएस सत्यार्थ अनिरूद्ध पंकज, अशोक वेंकटेश आणि अनिल यादव या तिघांनी या घोटाळ्याची चौकशी सुरु केल्याने वेगाने तपासचक्रे फिरू लागली. या तिघांनी हा घोटाळा उघड केले.

ठळक मुद्देया घोटाळ्याच्या तपासात पोलीस अधिकाऱ्यांनी पाळत ठेवण्यासह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला.पोलीस अधिकाऱ्यांनी डॉ. कृष्णा लाल पटेल, शाळेचे संचालक ललित त्रिपाठी आणि लेखापाल संतोष बिंदू यांची चौकशी केली.

प्रयागराज - उत्तर प्रदेशामध्ये ६९,००० शिक्षक सहाय्यक भरतीतील टॉपर्सच्या यादीतील काही नावे होती, त्याच्याविरोधात हजारो उमेदवाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. १५० गुणांपैकी १४० गुण प्राप्त करणाऱ्यांमध्ये कोणी ड्रायव्हर तर कोणी डीजेवाला बाबू असल्याचे सांगितले गेले. जेव्हा तक्रार मिळाली, तेव्हा प्रयागराजचे आयपीएस सत्यार्थ अनिरूद्ध पंकज, अशोक वेंकटेश आणि अनिल यादव या तिघांनी या घोटाळ्याची चौकशी सुरु केल्याने वेगाने तपासचक्रे फिरू लागली. या तिघांनी हा घोटाळा उघड केले.या घोटाळ्याच्या तपासात पोलीस अधिकाऱ्यांनी पाळत ठेवण्यासह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. सीबीआयने आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली. छापेमारीत आयपीएस अधिकारी असल्याने कोणाला याबाबत शंका आली नाही. डॉक्टर आणि लेखापाल यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. कारवाई जलद गतीने करण्यात आली आणि घोटाळेबाजांची पोल खोल झाली. आता या प्रकरणाचा तपास एसटीएफला देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत एसटीएफपुढे मोठे आव्हान आहे. या टोळीत अद्याप शाळा व्यवस्थापक, सॉल्व्हर, दलाल आणि आरोपी उमेदवारांना अटक होणं बाकी आहे.६९,००० सहाय्यक शिक्षक भरतीमध्ये उमेदवार डॉ. कृष्णालाल पटेल यांच्याविरूद्ध फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला, परंतु कोणीही तक्रार करण्यास पुढे आले नाही. उमेदवारांकडून रॅकेटमधील भामट्यांनी लाखो रुपये वसूल झाले होते. ते उमेदवार भीतीपोटी पुढे येत नव्हते. ४ जून रोजी प्रतापगढमधील उमेदवार राहुलसिंग यांनी एसएसपीकडे संपर्क साधला असता तातडीने कारवाईस सुरुवात झाली. एसएसपी सत्यार्थ अनिरुद्ध पंकज यांनी राहुलच्या तक्रारीवरून सोरांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.एसएसपीने एएसपी अशोक व्यंकटेश आणि अनिल यादव यांना शिक्षण क्षेत्रात प्रामाणिक, कष्टकरी उमेदवारांची उपेक्षा करणाऱ्या माफियांची यंत्रणा उध्वस्त करण्यासाठी तपास करण्यास सांगितले. काही तासात तपासाचा परिणाम दिसू लागला. सुरवातीला पोलिसांनी त्या सहा संशयितांसह कारमधून साडेसात लाख रुपये ताब्यात घेतले. पोलीस अधिकाऱ्यांनी डॉ. कृष्णा लाल पटेल, शाळेचे संचालक ललित त्रिपाठी आणि लेखापाल संतोष बिंदू यांची चौकशी केली. या पथकाने त्यांच्याकडून २२ लाखाहून अधिक रोख रक्कम जप्त केली.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Video : अग्नितांडव! क्रॉफर्ड मार्केट परिसरात भीषण आग

 

थरारक हत्याकांड! सपासप चाकूने वार करून चिमुकलीचा आईने घेतला जीव नंतर संपविले स्वतःला  

 

Ajay Pandita Murder : भ्याड दहशतवाद्यांनो! हिम्मत असेल समोर या, मी तुम्हाला सोडणार नाही

 

खोट्या प्रेमाचं कडवट सत्य, तरुणीच्या शरीराचे तुकडे तुकडे करून केली हत्या 

 

संशयास्पद! माजी रणजी क्रिकेटपटू जयमोहन थंपी यांचा राहत्या घरात आढळला मृतदेह 

टॅग्स :fraudधोकेबाजीTeacherशिक्षकEducationशिक्षणPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशArrestअटक